Ruturaj Gaikwad  Dainik Gomantak
क्रीडा

Ruturaj Gaikwad Marriage: महाराष्ट्राच्या फास्ट बॉलरकडून ऋतुराज क्लिन-बोल्ड? कोण आहे त्याची होणारी बायको, घ्या जाणून

चेन्नई सुपर किंग्सचा फलंदाज ऋतुराज गायकवाड लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा होत आहे.

Pranali Kodre

Ruturaj Gaikwad Marriage: भारतीय क्रिकेट संघाचा आणि चेन्नई सुपर किंग्सचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड जूनच्या पहिल्या आठवड्यात लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चंना उधाण आले आहे. पण तो कोणाबरोबर लग्न करणार हा प्रश्न अद्यापही गुलदस्त्यात आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार ऋतुराज 3-4 जून दरम्यान लग्न करणार आहे. त्याचमुळे 7 ते 11 जून दरम्यान होणाऱ्या कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यासाठी त्याच्याऐवजी यशस्वी जयस्वालची भारतीय संघाच्या राखीव खेळाडूंमध्ये निवड करण्यात आली.

दरम्यान, ऋतुराज ज्या मुलीबरोबर लग्न करणार आहे, त्या मुलीचे नाव उत्कर्षा पवार असल्याची चर्चा होत आहे. उत्कर्षा पवार ही वेगवान गोलंदाज असून महाराष्ट्राच्या महिला क्रिकेट संघाकडून खेळते. 24 वर्षीय उत्कर्षा देखील ऋतुराजप्रमाणे पुण्यातच रहाते.

तसेच सध्या सोशल मीडियावरील चर्चांनुसार ऋतुराज आणि उत्कर्षा गेली अनेक वर्षे एकमेकांना ओळखत असून बऱ्याच वर्षापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. पण त्यांच्या रिलेशनशिपची चर्चा होत असली, तरी त्यांच्या नात्याबद्दल किंवा लग्नाबद्दल त्या दोघांनीही कोणतेही उघड भाष्य केलेले नाही.

ऋतुराजने शेअर केलेला फोटो

ऋतुराज सध्या आयपीएल 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळत असून त्याने या संघाकडून नुकताच 20 मे रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 50 वा आयपीएल सामना खेळला. यानिमित्ताने त्याने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात त्याने उत्कर्षाचा उल्लेख केला असून तिचा फोटोही पोस्टमध्ये शेअर केला आहे.

ऋतुराजने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की 'चेन्नई सुपर किंग्ससाठी 50 वा सामना. चेन्नई सुपर किंग्सचा भाग झाल्याचा अभिमान वाटतो. आम्ही प्लेऑफला गेल्याने आपल्यासाठी हा खास सामना होता. चेपॉकमध्ये भेटू.' या कॅप्शनमध्येच त्याने शेवटी लिहिले आहे की 'सरप्राईज भेटीसाठी थँक्यू @utkarshaaa13'.

तसेच त्याने शेअर केलेल्या या पोस्टच्या शेवटच्या फोटोमध्ये डेवॉन कॉनवेची पत्नी किम असून तिच्यासह एक मुलगी चेन्नईची जर्सी घातलेली दिसून येत आहे. तिला त्याने टॅग केले असल्याने ती उत्कर्षा असल्याचे स्पष्ट होत आहे.

त्याचमुळे त्यांच्यातील नात्याबद्दल चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यातच आता ऋतुराजच्या लग्नाचे वृत्त समोर येत असल्याने या चर्चांना अधिक उधाण आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT