Renuka Singh | India Women Cricket Team Dainik Gomantak
क्रीडा

INDW vs ENGW: इंग्लंडविरुद्ध रेणुका सिंगचा जलवा! 5 विकेट्स घेत अश्विन-भज्जीलाही टाकलं मागे, पाहा Video

Video: महिला टी20 वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्ध भारताकडून रेणुका सिंगने 5 विकेट्स घेत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

Pranali Kodre

Renuka Singh 5 Wickets Haul: महिला टी20 वर्ल्डकप 2023 स्पर्धेत शनिवारी भारतीय महिला विरुद्ध इंग्लंड महिला संघात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात इंग्लंडने 11 धावांनी विजय मिळवला. पण असे असले तरी भारताची वेगवान गोलंदाज रेणुका सिंगसाठी हा सामना वैयक्तिकरित्या विक्रमी ठरला. तिने या सामन्यात 5 विकेट्स घेत एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

या सामन्यात भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करताना रेणुका सिंगने सुरुवातीच्या 5 षटकातच इंग्लंडला तीन धक्के दिले.

तिने डावातील पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या षटकात गोलंदाजी करताना प्रत्येकी एक विकेट घेतली. तिने पहिल्या षटकात तिसऱ्या चेंडूवर डॅनिएल वॅटला शुन्यावर माघारी पाठवले. तसेच तिसऱ्या षटकात तिने ऍलिस कॅप्सीला 3 धावांवर, तर पाचव्या षटकात सोफीया डन्कलीला 10 धावांवर त्रिफळाचीत केले.

त्यानंतर तिने अखेरच्या षटकात गोलंदाजी करताना चौथ्या चेंडूवर एमी जोन्सला (40) आणि पाचव्या चेंडूवर कॅथरिन ब्रंटला (0) बाद करत 5 विकेट्स पूर्ण केल्या. रेणुकाने या 5 विकेट्स घेताना केवळ 15 धावा खर्च केल्या.

रेणुकाने रचला इतिहास

रेणुकाने 4 षटकांमध्ये 15 धावा देत 5 विकेट्स घेतल्याने ती आता टी20 वर्ल्डकपमध्ये सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन करणारी भारतीय क्रिकेटपटू ठरली आहे. यापूर्वी हा विक्रम प्रिंयका रॉयच्या नावावर होता. तिने 2009 च्या टी20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान महिला संघाविरुद्ध 16 धावांत 5 विकेट्स घेतल्या होत्या.

तसेच या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आर अश्विन आहे. अश्विनची टी20 वर्ल्डकपमधील सर्वोत्तम कामगिरी 11 धावांत 4 विकेट्स अशी आहे. त्याने ही कामगिरी 2014 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध केली होती. अश्विन भारतीय पुरुष संघाकडून टी20 वर्ल्डकपमध्ये सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन करणारा खेळाडू आहे.

टी20 वर्ल्डकपमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारे भारतीय गोलंदाज

5 विकेट्स/15 धावा - रेणुका सिंग (विरुद्ध इंग्लंड, टी20 वर्ल्डकप 2023)

5 विकेट्स/16 धावा - प्रियंका रॉय (विरुद्ध पाकिस्तान, टी20 वर्ल्डकप 2009)

4 विकेट्स/11 धावा - आर अश्विन (विरुद्ध ऑस्ट्रेलिया, टी20 वर्ल्डकप 2014)

4 विकेट्स/12 धावा - डायना डेव्हिड (विरुद्ध श्रीलंका, टी20 वर्ल्डकप 2010)

4 विकेट्स/12 धावा - हरभजन सिंग (विरुद्ध इंग्लंड, टी20 वर्ल्डकप 2012)

इंग्लंडचा विजय

रेणुकाने सुरुवालाच इंग्लंडला मोठे धक्के दिल्यानंतरही इंग्लंडच्या फलंदाजांनी चिवट झुंज देत 20 षटकात 7 बाद 151 धावा उभारल्या. इंग्लंडकडून नतालिया स्किव्हरने 50 धावांची अर्धशतकी खेळी केली. तिला कर्णधार हिदर नाईट (28) आणि एमी जोन्सकडून चांगली साथ मिळाली.

नंतर १५२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला 20 षटकात 5 बाद 140 धावाच करता आल्या. भारताकडून स्मृती मानधनाने 50 धावांची खेळी केली. तसेच ऋचा घोषने नाबाद 47 धावा केल्या. मात्र अन्य भारतीय फलंदाजांना विशेष योगदान देता आले नाही. त्यामुळे भारताला हा सामना 11 धावांनी गमवावा लागला. इंग्लंडकडून साराह ग्लेनने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT