Lionel Messi Dainik Gomantak
क्रीडा

लिओचा जलवा... जगात सगळ्यात जास्त विकली जाणारी जर्सी मेस्सीचीच

Manish Jadhav

Record in the name of Lionel Messi: लिओनेल मेस्सीचे जगभरात लाखो चाहते आहेत. त्याच्याबद्दल चाहत्यांमध्ये नेहमीच प्रचंड क्रेझ असते. जेव्हा कधी फुटबॉलची चर्चा होते आणि त्यात मेस्सीचे नाव येत नाही, असे कधी होतच नाही.

आता मेस्सीच्या नावाचा टी-शर्ट बाजारात धुमाकूळ घालत आहे. मेस्सीचा टी-शर्ट सर्वाधिक विकला जाणारा टी-शर्ट बनला आहे. मेस्सीचा टी-शर्ट अवघ्या तीन महिन्यांत सर्वाधिक विकला जाणारा MLS जर्सी बनला आहे.

मेस्सीच्या जर्सीचा जलवा

मेजर लीग सॉकरने खुलासा केला की, मेस्सीचा शर्ट त्यांच्या वेबसाइटवर यावर्षी सर्वाधिक विक्री होणारी MLS जर्सी बनला आहे. या एपिसोडमध्ये, मेस्सीच्या जर्सीने इतर सर्व खेळाडूंच्या जर्सीला मागे टाकले आहे, यावरुन तुम्हाला मेस्सीच्या फॅन फॉलोइंगची कल्पना येऊ शकते.

अमेरिकेत (America) मेस्सीची क्रेझ प्रचंड आहे. इंटर मियामी गेम्सच्या तिकिटांच्या किमती ज्याप्रमाणे येथे गगनाला भिडल्या आहेत, त्याचप्रमाणे मेस्सीच्या टी-शर्टची विक्रीही गगनाला भिडली आहे.

सर्वाधिक विकल्या जाणार्‍या जर्सी

MLS ने सांगितले की, 1 जानेवारी ते 12 सप्टेंबर 2023 या कालावधीत त्यांच्या ऑनलाइन स्टोअरमध्ये 10 जर्सी सर्वाधिक विकल्या जाणार्‍या जर्सी आहेत. MLS ने एकूण 25 जर्सींची नावे जाहीर केली आहेत, ज्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या जर्सी आहेत.

या यादीत मेस्सीच्या दोन सहकाऱ्यांचीही नावे आहेत. सर्जिओ बुस्केट्स आणि जोसेफ मार्टिनेझ यांच्या जर्सी अनुक्रमे 13व्या आणि 21व्या क्रमांकावर आहेत. MLS ची लोकप्रियता ज्या प्रकारे वाढत आहे, ते पाहता लिओनेल मेस्सी (Lionel Messi) यूएसमध्ये आल्यानंतर जर्सीच्या विक्रीने येत्या काही दिवसांत यूएस मार्केटमध्ये आणखी मोठा प्रभाव पाडला तर आश्चर्य वाटणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'गोवा पोलिस' अंमलीपदार्थांविरोधी गंभीर! 'कोकेन जप्ती'प्रकरणी दिल्ली पोलिसांना करणार सहकार्य

Quelossim: ही तर नौटंकी! केळशीची बदनामी केल्याचा व्हेंझी यांच्‍यावर सरपंचांचा आरोप

Sunburn Festival 2024: धार्मिक स्थळी 'असले' कार्यक्रम नकोच! 'सनबर्न' साठीच्या सभेनंतर ग्रामस्थ ठरवणार दिशा

Israel-Iran War: इस्रायल-इराण युद्धानं सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार! भारतासह जगभरातील देशांना बसणार फटका

वेलिंगकरप्रकरणी 'लुकआऊट नोटीस' जारी! हिंदुत्ववादी संघटनांचे समर्थन; पोलिसांची पथके मागावर

SCROLL FOR NEXT