Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

Virat Kohli Century: किंग कोहलीचा नादच खुळा! सलग दुसरी सेंच्युरी करत IPL मध्ये रचला इतिहास

रविवारी विराट कोहलीने गुजरात टायटन्सविरुद्ध शतकी खेळी करत IPL च्या इतिहासात मोठा विक्रम केला आहे.

Pranali Kodre

Virat Kohli second Century in IPL 2023: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत रविवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स संघात सामना होत आहे. या सामन्यात बेंगलोरचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीने शतकी खेळी केली आहे. विराटचे हे आयपीएल 2023 मधील सलग दुसरे शतक आहे.

विराटने रविवारी 60 चेंडूत शतकी खेळी केली. त्याचे हे आयपीएल कारकिर्दीतील सातवे शतक ठरले आहे. त्यामुळे तो आयपीएल इतिहासात सात शतके करणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे. त्याने ख्रिस गेलच्या 6 आयपीएल शतकांच्या विक्रमाला मागे टाकले आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके करणारे खेळाडू

  • 7 - विराट कोहली

  • 6 - ख्रिस गेल

  • 5 - जोस बटलर

  • 4 - केएल राहुल, शेन वॉटसन, डेव्हिड वॉर्नर

विराटचे सलग दुसरे शतक

विराटने आयपीएल 2023 मध्ये पहिले शतक 18 मे रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध केले होते. त्याने त्या सामन्यात 100 धावांची खेळी केली होती. त्यानंतर आता त्याने गुजरातविरुद्धही शतकी खेळी केली आहे. विराटने आयपीएल 2023 मध्ये 600 धावांचा टप्पाही पार केला आहे.स

विराटच्या शतकामुळे बेंगलोरने उभारला धावांचा डोंगर

रविवारी होत असलेल्या सामन्यात विराटने 61 चेंडूत 101 धावांची नाबाद खेळी करताना 13 चौकार आणि 1 षटकार मारला. त्याने या सामन्यात सलामीला फाफ डू प्लेसिसबरोबर 67 धावांची खेळी केली होती. त्यांनंतर त्याची अनुज रावतबरोबरही सहाव्या विकेटसाठी 64 धावांची नाबाद भागीदारी झाली.

पण बेंगलोरकडून विराट व्यतिरिक्त कर्णधार फाफ डू प्लेसिस (28), मायकल ब्रेसवेलने (26) आणि अनुज रावत (23*) यांनाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली. त्यामुळे बेंगलोरने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 197 धावा केल्या.

गुजरातकडून नूर अहमदने 2 विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद शमी, यश दयाल आणि रशिद खान यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

Delhi Protest: संवादाचे दरवाजे बंद करणाऱ्या सरकारला सर्वोच्च न्यायालयाची चपराक; जंतरमंतरवरील निर्बंध तातडीने उठवण्याचे आदेश!

SCROLL FOR NEXT