Jitesh Sharma Video Dainik Gomantak
क्रीडा

VIDEO: 15 चेंडूत 40 धावांची गरज... अन् शेवटचा चेंडू! आरसीबीचा पॉवर हिटर पास झाला की फेल? सोशल मीडियावर थरार व्हायरल

Jitesh Sharma Viral Video : आयपीएल 2026 च्या रणधुमाळीला सुरुवात होण्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (RCB) धडाकेबाज फलंदाज जितेश शर्मा एका वेगळ्याच रुपात पाहायला मिळाला.

Manish Jadhav

Jitesh Sharma Viral Video: आयपीएल 2026 च्या रणधुमाळीला सुरुवात होण्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (RCB) धडाकेबाज फलंदाज जितेश शर्मा एका वेगळ्याच रुपात पाहायला मिळाला. मैदानावरील चौफेर फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या जितेशने थेट रस्त्यावर उतरुन 'गल्ली क्रिकेट'चा आनंद लुटला. यावेळी त्याने स्वतःला 15 चेंडूत 40 धावा करण्याचे कठीण आव्हान दिले होते, जे त्याने शेवटच्या चेंडूवर षटकार खेचून अतिशय स्टायलिश पद्धतीने पूर्ण केले.

भररस्त्यात खेळल्या गेलेल्या या सामन्यात स्थानिक गोलंदाजांनी त्याला सिंथेटिक चेंडूंनी गोलंदाजी केली. जितेशने डावाची सुरुवात दोन उत्तुंग षटकारांनी केली, ज्यामुळे बघ्यांची मोठी गर्दी जमली. मधल्या काही चेंडूंवर त्याला फटके मारताना अडचण आली आणि काही चेंडू 'डॉट' ही गेले, तरीही त्याने आपला आक्रमक पवित्रा सोडला नाही. चौथ्या आणि सहाव्या चेंडूवर अनुक्रमे चौकार आणि षटकार ठोकत त्याने धावांचा वेग कायम ठेवला.

सामना शेवटच्या षटकात आला तेव्हा जितेशला विजयासाठी 6 चेंडूत 12 धावांची गरज होती. षटकातील पहिला चेंडू निर्धाव गेल्याने दडपण वाढले होते, मात्र दुसऱ्याच चेंडूवर त्याने चौकार ठोकून समीकरण 4 चेंडूत 8 धावा असे सोपे केले. त्यानंतर पुन्हा एक षटकार लगावत त्याने विजय खेचून आणला. कमालीची उत्सुकता ताणली गेलेली असताना पुढचे दोन चेंडू पुन्हा 'डॉट' गेले, मात्र जितेशने हार मानली नाही. शेवटच्या चेंडूवर दोन धावा हव्या असताना त्याने थेट प्रेक्षणीय षटकार खेचून आपले चॅलेंज पूर्ण केले.

विशेष म्हणजे, 2025 मध्ये आरसीबीने (RCB) 18 वर्षांनंतर पहिल्यांदाच आयपीएलचे विजेतेपद पटकावले आणि त्या विजयात जितेश शर्माचा मोलाचा वाटा होता. विशेषतः लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या 'करो या मरो'च्या सामन्यात त्याने केवळ 33 चेंडूत नाबाद 85 धावांची खेळी खेळून 227 धावांचे महाकाय लक्ष्य यशस्वीरीत्या पार करुन दिले होते. आता 28 मार्च रोजी चिन्नास्वामी स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणाऱ्या पहिल्या सामन्यात जितेश पुन्हा एकदा आरसीबीच्या विजयाचा पाया रचण्यासाठी सज्ज झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

Viral Video: 'पोरांचं काय चाललंय?' एकाच बाईकवर सहा शाळकरी मुलांचा थरारक प्रवास; व्हिडिओ समोर येताच पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT