Ravindra Jadeja | Best Fielder Medal | India vs Bangladesh BCCI
क्रीडा

Team India Video: जड्डूने मेडल अन् मनंही जिंकली! थेट स्टेडियमच्या स्क्रिनवर फोटो झळकताच टीम इंडियाचा कल्ला

Ravindra Jadeja: बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात जडेजाच बेस्ट फिल्डरचा मानकरी ठरला, यावेळी भारतीय संघाने जोरदार जल्लोष केला होता.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs Bangladesh, Ravindra Jadeja won Best Fielder Medal in Dressing Room:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत गुरुवारी (19 ऑक्टोबर) भारतीय संघाने बांगलादेशविरुद्ध ७ विकेट्सने विजय मिळवला. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनवर पार पडलेल्या या सामन्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने ड्रेसिंग रुममध्येही जोरदार सेलिब्रेशन केले. यावेळी या सामन्यातील सर्वोत्तम झेलासाठी रविंद्र जडेजाला पदकही देण्यात आले.

वनडे वर्ल्डकप सुरू झाल्यापासून भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये प्रत्येक सामन्यानंतर संघातील एका खेळाडूची क्षेत्ररक्षक प्रशिक्षक टी दिलीप यांच्याकडून सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून निवड केली जाते.

पहिल्या तीन सामन्यांमध्ये अनुक्रमे विराट कोहली, शार्दुल ठाकूर आणि केएल राहुलला हे पदक मिळाले आहे.  आता, ते पदक मिळवण्यासाठी भारतीय संघाच्या खेळाडूंमध्येही शर्यत पाहायला मिळत आहे. हीच गोष्ट भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यातही पाहायला मिळाली.

झाले असे की या सामन्यात यष्टीरक्षक केएल राहुलने 25 व्या षटकात मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर मेहदी हसन मिराजचा शानदार झेल घेतला होता.

तसेच 43 व्या षटकात जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर मुश्फिकूर रहिमचा जडेजाने हवेत सूर मारत झेल घेतलेला. याशिवाय कुलदीप यादवनेही चांगले क्षेत्ररक्षण केले होते. त्यामुळे हे पदक मिळवण्यासाठी दावेदारी अनेकांनी मिळवली होती.

याचदरम्यान, जडेजाने झेल घेतल्यानंतर मजेने ते पदक मला द्यावं लागणार अशी रिऍक्शनही टी दिलीप यांना दिली होती. त्यामुळे आता खरंच बांगलादेशविरुद्धच्या सामन्यानंतर हे पदक कोणाला मिळणार याबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती. अखेर बीसीसीआयने शुक्रवारी व्हिडिओ शेअर करत सर्वांना याबद्दल माहिती दिली.

बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये भारतीय संघाची ड्रेसिंग रुममधील मस्तीही दिसून येत आहे. दरम्यान, सुरुवातीला केएल राहुल म्हणत आहे की 'सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचे पदक मला मिळायला हवे, पण ही शर्यत रोमांचक करण्यासाठी टी दिलीप दुसऱ्या खेळाडूला देतील. त्यासाठी जडेजा आणि कुलदीप हे दावेदार आहेत.'

यानंतर ड्रेसिंग रुममध्ये भारतीय संघातील सर्व सदस्य उपस्थित असताना टी दिलीप हे या सामन्यात चांगले योगदान देणाऱ्या खेळाडूंचे कौतुक करताना दिसत आहेत.

यादरम्यान, त्यांनी जडेजा, कुलदीप आणि केएल राहुल या तिघांबरोबरच भारतीय संघातील सर्वच खेळाडूंचे धावा वाचवण्यासाठी क्षेत्ररक्षणावेळी करत असलेल्या मेहनतीबद्दल कौतुक केले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे क्षेत्ररक्षणावेळी भारतीय संघाने बांगलादेशविरुद्ध 13 धावा वाचवल्या.

तसेच त्यानंतर त्यांनी सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून जडेजाची घोषणा केली, पण यावेळी एक ट्वीस्ट आणला. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर टीव्हीवर केएल राहुलचा फोटो झळकावत त्याला विजेता घोषित करण्यात आले होते, पण बांगलादेशविरुद्धच्या सामन्यानंतर थेट पुण्यातील स्टेडियमच्या स्क्रिनवर जडेजाचा सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून फोटो झळकावण्यात आला.

तसेच त्या स्क्रिनवर जडेजाच्या क्षेत्ररक्षणाचे व्हिडिओही दाखवण्यात आले. दरम्यान, ज्यावेळी जडेजाचा फोटो स्क्रिनवर झळकला, तेव्हा भारतीय संघातील खेळाडूंनी ड्रेसिंग रुममध्ये जोरदार जल्लोष केला. तसेच जडेजाला केएल राहुलने ते मेडल घातले. पण नंतर जडेजानेही ते मेडल गळ्यातून काढून टी दिलीप यांच्या गळ्यात घालत सर्वांचे मन जिंकले.

तथापि, या सामन्यात बांगलादेशने 50 षटकात 8 बाद 256 धावा केल्या होत्या. त्यानंतर 257 धावांच्या आव्हानाचा पाठलाग भारताने 41.3 षटकात 3 विकेट्स गमावत पूर्ण केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

IFFI मध्ये Goan Director's Cut चे आकर्षण! सगळ्या गोमंतकीय सिनेमांची माहिती घ्या एका क्लिकमध्ये

Goa Today's News Live: कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

SCROLL FOR NEXT