Ravindra Jadeja Dainik Gomantak
क्रीडा

Ravindra Jadeja Record: सर जडेजाने मोडला 27 वर्ष जुना रेकॉर्ड, अनिल कुंबळेला सोडले मागे; कुलदीप यादवही शर्यतीत

Ravindra Jadeja World Cup Record: एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये भारतीय फलंदाजांसोबतच गोलंदाजांनीही दमदार कामगिरी केली आहे.

Manish Jadhav

Ravindra Jadeja World Cup Record: एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये भारतीय फलंदाजांसोबतच गोलंदाजांनीही दमदार कामगिरी केली आहे. मग वेगवान गोलंदाज असोत की फिरकीपटू, प्रत्येकाने विश्वचषकात अप्रतिम गोलंदाजी केली आहे.

जसप्रीत बुमराह 17 विकेट्ससह भारताचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. तर रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमीने 16-16 विकेट्स घेतल्या आहेत.

कुलदीप यादवनेही 14 विकेट्स घेतल्या आहेत. पण रवींद्र जडेजाने एकदिवसीय विश्वचषकात 16 विकेट घेत भारतासाठी इतिहास रचला आहे. त्याने अनिल कुंबळेला मागे टाकले आहे.

जड्डूने कुंबळेला मागे टाकले

दरम्यान, रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) 2023 च्या विश्वचषकात 9 सामने खेळून आतापर्यंत 16 विकेट्स घेतल्या आहेत. एकदिवसीय विश्वचषकाच्या एकाच मोसमात सर्वाधिक विकेट्स घेणारा तो भारतीय फिरकी गोलंदाज बनला आहे.

त्याने 1996 च्या विश्वचषकात 15 विकेट्स घेणारा अनिल कुंबळे आणि 2011 च्या विश्वचषकात 15 विकेट्स घेणाऱ्या युवराज सिंगला मागे टाकले आहे. सध्या कुलदीप यादव या शर्यतीत आहे. त्याच्या नावावर 9 सामन्यात 14 विकेट्स आहेत. या स्पर्धेच्या अखेरीस तो नवीन शिखर गाठू शकतो.

जड्डूची जादू

दरम्यान, रवींद्र जडेजाने या विश्वचषकात आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धही (South Africa) त्याने 5 विकेट्स घेतल्या होत्या. गरज पडेल तेव्हा तो अनेक सामन्यांमध्ये बॅटने चमत्कार करतानाही दिसला आहे.

उपांत्य फेरीत संघासाठी त्याची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. या संपूर्ण स्पर्धेत फिरकीपटूंची ताकद दिसून आली आहे. अॅडम झाम्पा 22 विकेट्ससह स्पर्धेतील आघाडीचा विकेट घेणारा गोलंदाज आहे.

उपांत्य फेरीत न्यूझीलंडशी सामना

भारतीय संघ आता उपांत्य फेरीत 15 नोव्हेंबरला मुंबईतील वानखेडेवर न्यूझीलंडशी भिडणार आहे. भारतीय संघाची ही सलग चौथी उपांत्य फेरी असेल. 2019 मध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना झाला होता. मेन इन ब्लू या उपांत्य फेरीत गेल्या विश्वचषकातील पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न करतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT