Ravindra Jadeja ODI Career Over Cheteshwar Pujara Statement: भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाच्या वनडे करिअरबाबत सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात जडेजाला स्थान देण्यात आलेले नाही. तो अखेरचा सप्टेंबर 2026 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत खेळताना दिसला होता. या प्रकारात त्याच्याऐवजी आता अक्षर पटेलला प्राधान्य दिले जात असून, यामुळे आगामी 2027च्या वनडे विश्वचषकासाठीही जडेजाच्या संघात असण्याबाबत शंका उपस्थित होत आहे.
अशातच भारताचा अनुभवी कसोटीपटू चेतेश्वर पुजाराने जडेजाच्या वनडे भविष्याबाबत एक मोठे आणि खळबळजनक वक्तव्य केले. पुजाराच्या मते, जडेजाचे वनडे करिअर आता जवळपास संपले असून संघ व्यवस्थापन त्याला या फॉरमॅटच्या योजनांमध्ये पाहत नाहीये.
पुजाराच्या मते, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून जडेजाला वगळणे हा त्याच्या वनडे करिअरच्या शेवटचा थेट संकेत असू शकतो. जर संघ व्यवस्थापनाची जडेजाला संघात ठेवण्याची इच्छा असती, तर त्याला या मालिकेत नक्कीच संधी मिळाली असती. अक्षर पटेलला मुख्य अष्टपैलू म्हणून सातत्याने संधी दिली जात असल्याने व्यवस्थापनाने आता पुढचा विचार करण्यास सुरुवात केल्याचे स्पष्ट होते. जिओस्टारवर बोलताना पुजारा म्हणाला की, जडेजाने यापूर्वीच टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आता त्याचे वय आणि संघाची रणनीती पाहता, तो केवळ कसोटी क्रिकेटवरच लक्ष केंद्रित करेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
दुसरीकडे, भारताचा माजी फलंदाजी प्रशिक्षक अभिषेक नायर याचे मत पुजारापेक्षा थोडे वेगळे आहे. नायरच्या मते, जडेजा अजूनही संघाच्या प्लॅनिंगचा भाग राहू शकतो. विशेषतः जर मुख्य अष्टपैलू अक्षर पटेल दुखापतग्रस्त झाला, तर जडेजा हा संघासाठी सर्वात मजबूत पर्याय ठरु शकतो. एकीकडे पुजाराने जडेजाचे वनडे करिअर संपल्याचे संकेत दिले असले, तरी नायरच्या मते भविष्यात पुनरागमनाची शक्यता अद्याप पूर्णपणे संपलेली नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.