IPL 2022 Dainik Gomantak
क्रीडा

जडेजाला पुन्हा CSK चे कर्णधार पद नाही! पुढील मोसमात 'हा' खेळाडू घेऊ शकतो धोनीची जागा

एमएस धोनी बद्दल बोलायचे झाले, तर या संघाचा खेळाडू म्हणून हा त्याचा शेवटचा हंगाम देखील असू शकतो.

दैनिक गोमन्तक

IPL 2022 मध्ये चार वेळचा चॅम्पियन संघ चेन्नई सुपर किंग्ज (CSK) चे काय झाले ते सर्वांनी पाहिलेच आहे. खुद्द महेंद्रसिंग धोनीसारखा (MS Dhoni) अनुभवी कर्णधारही या संघाला प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडण्यापासून वाचवू शकला नाहीये. पण धोनीच्या हाती सीएसकेचे कर्णधारपद येईपर्यंत रवींद्र जडेजाने आपल्या कर्णधारपदाखाली संघाला बुडवले असं म्हणायला हरकत नाही. आता या खेळाडूला आगामी काळात CSK चे कर्णधारपद मिळण्याची शक्यता फारच कमी असल्याचे चित्र आहे. (Ravindra Jadeja no longer CSK captain This season Ha can replace MS Dhoni)

आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये, सीएसकेचा नवा कर्णधार रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) आधीच आपल्या संघाला बुडवले होते. मोसमातील पहिल्या सामन्यापूर्वीच जडेजाला CSK संघाचे कर्णधारपद मिळाले. जडेजाने 8 सामन्यात संघाचे नेतृत्व केले आहे. ज्यामध्ये CSK संघाने केवळ 2 सामन्यात विजय मिळवला आहे. या संघाला उर्वरित 6 सामने गमवावे लागले आहेत. जडेजा कर्णधारपदाखाली फारसा सक्रिय दिसला नाही आणि तो धोनीच्या हातात सर्व काही सोपवून बहुतेक सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना दिसून येत असायचा. अशा स्थितीत या खेळाडूकडे कर्णधारपदाची ताकद नसल्याचे स्पष्ट झाले. जेव्हा हा खेळाडू धोनीच्या साथीने संघ चालवू शकत नाही, तेव्हा त्याला संघ चालवणे खूप कठीण जात असल्याचे दिसून येत आहे.

दुसरीकडे, जर आपण एमएस धोनी बद्दल बोलायचे झाले, तर या संघाचा खेळाडू म्हणून हा त्याचा शेवटचा हंगाम देखील असू शकतो. धोनीने या मोसमापूर्वीच सीएसकेचे कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र जडेजा गेल्यानंतर त्याला पुन्हा एकदा संघाची कमान स्वत:च्या हातात घ्यावी लागली आहे. मात्र, गेल्या 2-3 वर्षांत त्याचा बॅटमधील फॉर्म खूपच खराब असल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत हा दिग्गज बहुधा शेवटच्या वेळी संघाकडून खेळताना दिसतो आहे.

सीएसकेच्या पुढील कर्णधाराची चर्चा आणखीणच तीव्र होणार आहे. संघाचा सलामीचा फलंदाज ऋतुराज गायकवाड हे पद सांभाळू शकतो असे सांगितले जात आहे. गायकवाड खूपच तरुण असून त्यांची कारकीर्द CSK संघासाठी खूप मोठी आहे. सीएसकेच्या व्यवस्थापनाचाही या खेळाडूवर विश्वास असून त्यांनी लिलावापूर्वीच मोठी रक्कम खर्च करून गायकवाडला आपल्या संघात खेळाडूम्हणून कायम ठेवले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT