Ravindra Jadeja Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NEP: जड्डूने ठोकला शड्डू, आशिया कपमध्ये केला 'हा' खास रेकॉर्ड!

India vs Nepal Asia CUP 2023: आशिया चषक 2023 मध्ये आज भारत आणि नेपाळ यांच्यात सामना सुरु आहे.

Manish Jadhav

India vs Nepal Asia CUP 2023: आशिया चषक 2023 मध्ये आज भारत आणि नेपाळ यांच्यात सामना सुरु आहे.

सलामीवीर आसिफ शेखचे अर्धशतक आणि सोमपाल कामीच्या आकर्षक खेळीच्या जोरावर नेपाळने भारताविरुद्ध 48.2 षटकात 230 धावांची सन्मानजनक धावसंख्या उभारली.

या खेळीदरम्यान टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाने एक मोठा विक्रम केला. या डावात रवींद्र जडेजाही भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला.

जडेजाचा खास रेकॉर्ड

नेपाळविरुद्ध (IND vs NEP) रवींद्र जडेजाने शानदार प्रदर्शन केले. त्याने 40 धावांत तीन बळी घेतले. यासह रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आशिया चषक एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत संयुक्तपणे भारताचा नंबर 1 गोलंदाज बनला आहे. त्याने माजी क्रिकेटपटू इरफान पठाणची बरोबरी केली आहे.

इरफान पठाणच्या विक्रमाशी बरोबरी

माजी क्रिकेटपटू इरफान पठाणच्या (Irfan Pathan) नावावर आशिया चषकात 22 विकेट आहेत. यासोबतच रवींद्र जडेजाच्या नावावर 22 विकेट्स आहेत. या डावात जडेजाने भीम शार्की, रोहित पौडेल आणि कौशल मल्लाला आऊट केले.

अशा स्थितीत त्याला आता पुढील सामन्यात इरफान पठाणला मागे टाकण्याची संधी असेल. या यादीत सचिन तेंडुलकरचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे, त्याने आशिया कप वनडेमध्ये एकूण 17 विकेट घेतल्या आहेत.

नेपाळच्या फलंदाजांनी आपली ताकद दाखवून दिली

नेपाळला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यानंतर आसिफ शेख (97 चेंडूत 58 धावा) आणि कुशल भुरटेल (25 चेंडूत 38 धावा) यांनी पहिल्या विकेटसाठी 65 धावा काढल्या.

खालच्या फळीत सोमपालने 56 चेंडूत 48 धावांची उपयुक्त खेळी खेळली. नेपाळच्या फलंदाजांनी डावाच्या सुरुवातीलाच भारतीय गोलंदाजांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.

नेपाळने पहिल्या पॉवरप्लेच्या 10 षटकांत 1 गडी बाद 65 धावा केल्या, ज्यात सात चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. मात्र, टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चांगले पुनरागमन करत नेपाळला 230 धावांवर रोखले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Accident: पेडणेजवळ थरार! महिंद्रा कार खांबावर आदळली, गाडीचा चक्काचूर; नवरा-बायको गंभीर जखमी

Goa Politics: 'देवाची शपथ घेऊनसुद्धा काँग्रेसचे आमदार भाजपसोबत गेल्याचा इतिहास'! आतिषी यांची सडेतोड मुलाखत; Watch Video

Diwali 2025: दिवाळी तोंडावर तरी दुकानदार, विक्रेते चिंतेत! ‘ऑनलाईन’ खरेदीचा फटका; घोंगावतेय पावसाचे सावट

Goa Live News: पंचांना अपात्र ठरवण्याचा आदेश रद्द!

Ramsetu: भुईपालचे विद्यार्थी करणार ‘रामसेतू’वर संशोधन! 43 शिक्षक, विद्यार्थी ‘धनुषकोडी’कडे रवाना; प्रशिक्षण यात्रांतर्गत उपक्रम

SCROLL FOR NEXT