Ravindra Jadeja | Steve Smith 
क्रीडा

IND vs AUS: 'स्मिथच्या विकेटचं सिक्रेट सांगणार नाही कारण तुम्ही...', जडेजाचे भन्नाट उत्तर

Ravindra Jadeja: ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ याची विकेट कसा घेतो, याबद्दल जडेजाने खुलासा करण्यास नकार देताना भन्नाट कारण दिले आहे.

Pranali Kodre

Ravindra Jadeja denied to reveal secret behind his Success against Steve Smith :

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात रविवारी (8 ऑक्टोबर) वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेचा 5 वा सामना पार पडला. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात भारताने 6 विकेट्सने विजय मिळवला.

या सामन्यात भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जेडेजाने 3 विकेट्स घेतल्या. यातील एक विकेट ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथची होती. पण स्मिथची विकेट कशी घेतो, याबद्दल खुलासा करण्यास मात्र जडेजाने नकार दिला आहे. यामागील कारणही त्याने स्पष्ट केले आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, जडेजा, कुलदीप यादव आणि आर अश्विन यांच्या फिरकी गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाची फलंदाजी गडगडली आणि 49.3 षटकात त्यांचा संघ 199 धावांवर सर्वबाद झाला. जडेजाने स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉयनिस आणि ऍलेक्स कॅरे यांच्या विकेट्स घेतल्या.

दरम्यान जडेजाने स्मिथला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10व्यांदा बाद केले. स्मिथ अनेकदा यापूर्वीही जडेजाच्या गोलंदाजीवर संघर्ष करतना दिसला आहे.

त्यामुळे त्याच्याविरुद्ध जडेजाच्या यशाचे काय रहस्य आहे, याबद्दल पत्रकारांनी जडेजाला विचारले, त्यावर जडेजा मजेने म्हणाला, 'नाही, नाही, मी तुम्हाला सांगणार नाही. तुम्ही ते इंग्लिंशमध्ये छापणार आणि त्यामुळे त्यांना ते सर्व समजेल. मी हे तुम्हाला सांगणार नाही.'

जडेजाने गुडलेंथला चेंडू टाकला होता, ज्यावर त्याला वळण मिळाले आणि स्मिथच्या बॅटला लागून चेंडू थेट ऑफ स्टंपवर गेला. त्यामुळे स्मिथला 46 धावांवर बाद व्हावे लागले होते.

जडेजा स्मिथच्या विकेटबद्दल नंतर म्हणाला, 'जेव्हा मी पहिले षटक टाकत होतो, तेव्हा चेंडू धीम्यागतीने थांबून येत होता. मी विचार केला की दुपार आहे, उष्णता आहे आणि खेळपट्टीही सुकी आहे. त्यामुळे मी विचार केला की स्टंप लाईनवर गोलंदाजी करणे योग्य असेल. येथून काही चेंडू सरळ जात होते, तर काही वळत होते, त्यामुळे फलंदाजांना खेळणे सोपे नव्हते.'

तो म्हणाला, 'माझी हीच योजना होती की मी चेंडू स्टंपवर टाकावे आणि सुदैवाने स्मिथला टाकलेला चेंडू जास्त फिरला. त्यामुळे मी माझ्या योजना साध्या ठेवल्या होत्या. मी ही गोलंदाजीला पोषक असेलेली कसोटी सामन्याची विकेट असल्याचा विचार करून गोलंदाजी केली. मी खूप प्रयोग केले नाहीत, कारण खेळपट्टीवर सर्व होत होते. त्यामुळे मी स्टंप वर गोलंदाजी करण्याचाच प्रयत्न करत होतो.'

दरम्यान, ऑस्ट्रेलियाकडून स्मिथ व्यतिरिक्त डेव्हिड वॉर्नरने 41 धावांची खेळी केली. तसेच मिचेल स्टार्कने 28 धावांची खेळी केली. याव्यतिरिक्त मात्र, कोणालाही 20 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही.

भारताकडून जडेजाव्यतिरिक्त जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर आर अश्विन, मोहम्मद सिराज आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

त्यानंतर 200 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने 2 धावातच 3 विकेट्स गमावल्या होत्या. पण त्यानंतर विराट कोहली आणि केएल राहुल यांनी अर्धशतके झळकावत भारताला विजयापर्यंत पोहचवले. विराटने 85 धावा केल्या, तर केएल राहुलने 97 धावांची नाबाद खेळी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रावळपिंडी एक्सप्रेसचं स्लिप ऑफ टंग! अख्तरच्या तोंडून अभिषेक शर्माऐवजी अभिषेक बच्चनचं नाव, त्याने पोस्ट करत दिली प्रतिक्रिया Watch Video

Shehbaz Sharif Video: 'पाकिस्तान दहशतवाद कधी थांबवणार?' रिपोर्टरच्या थेट प्रश्नावर काय म्हणाले शाहबाज शरीफ? शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ व्हायरल

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

Makharotsav: ..उत्सवमूर्ती जिवंत झाल्याचा आभास देणारा 'मखरोत्सव', गोव्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन

SCROLL FOR NEXT