KL Rahul Dainik Gomantak
क्रीडा

IND vs ENG: दुसऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडियात बदल! जडेजा-केएल राहुल संघाबाहेर, तर सर्फराजसह तिघांची रोहितसेनेत एन्ट्री

Ravindra Jadeja and KL Rahul: इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.

Manish Jadhav

Ravindra Jadeja and KL Rahul: इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. रवींद्र जडेजानंतर आता स्टार खेळाडू केएल राहुलही बाहेर गेला आहे. हे दोघेही दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ही माहिती दिली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना 25 जानेवारीपासून हैदराबादमध्ये खेळला गेला होता. इंग्लंडने हा सामना 28 धावांनी जिंकला होता. आता दुसरा कसोटी सामना 2 फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम येथे खेळवला जाणार आहे.

निवेदनात म्हटले आहे की, ''रवींद्र जडेजा आणि केएल राहुल यांना विशाखापट्टणम येथे होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडावे लागले. हैदराबादमधील पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी जडेजाला दुखापत झाली होती, त्यानंतर राहुलनेही दुखापतीची तक्रार केली होती. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक दोघांवर लक्ष्य ठेवून आहे.''

बीसीसीआयने सांगितले की, ''निवड समितीने सर्फराज खान, सौरभ कुमार आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा भारतीय संघात समावेश केला आहे. गरज पडल्यास आवेश खानही कसोटी संघात सामील होईल.''

दरम्यान, जडेजा आणि राहुलच्या अनुउपस्थिती तीन खेळाडूंचे नशीब उजळले. स्टार फलंदाज सर्फराज खानशिवाय अष्टपैलू सौरभ कुमार आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा भारतीय संघात समावेश करण्यात आला. सर्फराजने गेल्या काही वर्षांत देशांतर्गत क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने 45 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 69.85 च्या उत्कृष्ट सरासरीने 3912 धावा केल्या आहेत. सर्फराजचा प्रथमच कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना 2 फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम येथे खेळवला जाणार आहे.

दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान, रजत पाटीदार, सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर आणि सौरभ कुमार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT