Latest ICC Test Rankings: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) नवीन कसोटी गोलंदाजी क्रमवारी (ICC Test Rankings) जाहीर केली आहे. या क्रमवारीत टीम इंडियाचा एक खेळाडू नंबर-1 कसोटी गोलंदाज बनला आहे. या भारतीय गोलंदाजाने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनकडून अव्वल गोलंदाजाचा मुकुट हिरावून घेतला आहे.
टीम इंडियाचा (Team India) अनुभवी फिरकीपटू आर अश्विन आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीत जगातील अव्वल क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे. तो सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत टीम इंडियाचा भाग आहे.
36 वर्षीय आर अश्विनने 2015 मध्ये नंबर 1 क्रमांकाचा कसोटी गोलंदाज होण्याचा मान मिळवला होता आणि तेव्हापासून अनेक वेळा तो अव्वल स्थानावर परतला आहे. अश्विनने त्याच्या सर्वात अलीकडील खेळात सहा विकेट घेत गोलंदाजांमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.
आर अश्विनला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेत मायदेशात उरलेल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करुन अव्वल स्थान कायम ठेवण्याची संधी आहे.
गोलंदाजीसोबतच अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत आर अश्विन दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. त्याचबरोबर गोलंदाजांच्या यादीत रवींद्र जडेजा 8व्या तर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
आर अश्विनने टीम इंडियासाठी आतापर्यंत 90 कसोटी सामने खेळले आहेत. आर अश्विनने या सामन्यांमध्ये एकूण 463 विकेट घेतल्या आहेत. तो भारताचा कसोटीतील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे. आर अश्विनने टीम इंडियासाठी 113 वनडे आणि 65 टी-20 सामनेही खेळले आहेत. आर अश्विनने वनडेमध्ये 151 आणि टी-20 मध्ये 72 विकेट्स घेतल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.