Ravi Shastri & Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

'गांगुली-द्रविडनेही विश्वचषक जिंकला नाही... कोहलीच्या बचावात उतरले शास्त्री मास्तर !

अनेक मोठे खेळाडू विश्वचषक जिंकू शकले नाहीत. याचं काय झालं? सौरव गांगुली, राहुल द्रविड (Rahul Dravid), अनिल कुंबळे विश्वचषक जिंकू नाहीत तर त्यांना वाईट खेळाडू म्हणायचे का?

दैनिक गोमन्तक

विराट कोहलीने भारतीय संघाचं कसोटी कर्णधार पद सोडल्यानंतर त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. जगभरातील दिग्गज क्रिकेटपटूंनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या. (Ravi Shastri Says Neither Saurabh Ganguly Nor Rahul Dravid Has Won The World Cup)

त्यातच आता भारतीय क्रिकेट संघाचे (Indian Cricket Team) माजी कर्णधार रवी शास्त्री (Ravi Shastri) म्हणाले, कर्णधारपद सोडल्यानंतरही विराट कोहली बदलणार नाही. तो पूर्वीसारखाच संघासाठी खेळणार आहे. कसोटी संघाच्या कर्णधारपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय एका दिवसात घेण्यात आलेला नाही. याआधी सप्टेंबरमध्ये त्याने टी-20 कर्णधारपद सोडले होते, तर डिसेंबरमध्ये त्याला एकदिवसीय कर्णधारपदावरुन काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर टीम इंडियामध्ये (Team India) निर्माण झालेली पोकळी सर्वांना दिसली. या दोघांनी मिळून संघाला भरपूर यश मिळवून दिले होते. T20 विश्वचषक (T20 World Cup) 2021 नंतर रवी शास्त्री टीम इंडियापासून वेगळे झाले होते.

दरम्यान, कोहलीच्या (Virat Kohli) टीम इंडियाचं कर्णधार पद सोडण्याच्या निर्णयावर शास्त्री म्हणाले, हा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. आणि आपण त्याच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे. ते पीटीआयशी बोलताना म्हणाले, 'हा त्याचा निर्णय आहे. त्याच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. यापूर्वीही अनेक मोठ्या खेळाडूंनी कर्णधारपद सोडून फलंदाजीवर लक्ष केंद्रित केले आहे. मग तो सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) असो, सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) असो की एमएस धोनी (MS Dhoni) आणि आता विराट कोहली.

'कोहली बदलणार नाही'

कर्णधारपद सोडल्यानंतर तो बदलला आहे का, असं विचारले असता शास्त्री म्हणाले, “मी या मालिकेत एकही चेंडू पाहिला नाही पण विराट कोहलीत फारसा बदल होईल असे मला वाटत नाही. मी सात वर्षांनी क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. एक मात्र नक्की की, मी सार्वजनिक ठिकाणी मतभेदांबद्दल बोलत नाही. माझा कार्यकाळ संपल्याच्या दिवसापासून मी सार्वजनिक मंचावर माझ्या खेळाडूंबद्दल बोलणार नाही, असे स्पष्ट केले होते.

'कर्णधारपदाचा निर्णय आयसीसीच्या जेतेपदावर होत नाही'

कोहली 68 पैकी 40 कसोटी जिंकून भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार राहिला, परंतु त्याच्या नेतृत्वाखाली मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाला कोणतेही ICC विजेतेपद जिंकता आले नाही. या आधारावर कर्णधाराला न्याय देऊ नये, असंही शास्त्री म्हणाले.

तसेच, अनेक मोठे खेळाडू विश्वचषक जिंकू शकले नाहीत. याचं काय झालं? सौरव गांगुली, राहुल द्रविड, अनिल कुंबळे जिंकू नाहीत तर त्यांना वाईट खेळाडू म्हणायचे का? आपल्याकडे किती विश्वचषक विजेते कर्णधार आहेत? सहा विश्वचषक खेळून सचिन तेंडुलकर जिंकला. शेवटी तुमचा खेळ पाहून तुमच्या भूमिकेवरुन निर्णय घेतला जातो. तुम्ही किती प्रामाणिकपणे खेळलात आणि किती काळ खेळलात?

शिवाय, कर्णधारपदाच्या मुद्द्यावर कोहलीच्या बीसीसीआयसोबतच्या भूमिकेबाबत ते म्हणाले, 'संवाद महत्त्वाचा आहे. त्यांच्यात काय झाले ते मला माहीत नाही. मी त्यातला भाग नव्हतो. दोन्ही बाजूंशी बोलल्याशिवाय मी काहीच बोलू शकत नाही. माहिती नसताना तोंड बंद ठेवणे कधीही चांगले.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: पुन्हा कोसळणार पावसाच्या धारा! गोव्याला 'शक्ती' वादळाचा धोका? मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा

‘गृहमंत्री गोव्‍याच्‍या मूडवर बोलले, गुंडगिरीवर नाही'; युरींचे टीकास्त्र; काणकोणकर हल्ल्याचा निषेध करण्यासाठी सांगे, कुंकळ्ळीत मेणबत्ती मोर्चा

RSS: 'महासत्तेसाठी संघ बनणार पंचप्राण'! CM सावंतांचे प्रतिपादन; गणवेषात विजयादशमी उत्सवात झाले सहभागी

Goa Politics: "तुम्ही भाजपची B-Team, आम्हीच तुम्हाला नाकारतो", काँग्रेस नेते सुरेंद्र राजपूत; गोवा निवडणुकीत काँग्रेस 'एकला चलो रे'

Diwali 2025: पणत्या बनवण्याचा वारसा मावळतोय! डिचोलीतील व्यवसाय अंधाराखाली; राज्याबाहेरील पणत्यांची चलती

SCROLL FOR NEXT