Ravi Shastri | MS Dhoni Dainik Gomantak
क्रीडा

धोनी टीम इंडियासाठी खेळणार WTC Final? रवी शास्त्री म्हणतायेत...

धोनीने निवृत्तीतून माघार घेऊन भारतासाठी खेळावे का, याबद्दल रवी शास्त्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Pranali Kodre

Ravi Shastri on MS Dhoni: भारताचा दिग्गज कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. त्याची मैदानातील कामगिरीही चांगली होत आहे, तसेच तो त्याच्या यष्टीरक्षणाच्या कौशल्यानेही सर्वांना प्रभावित करत आहे. त्याचे भारताचे माजी अष्टपैलू आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही कौतुक करताना युवा खेळाडूंनी त्याच्याकडून शिकायला पाहिजे असे म्हटले आहे.

भारताला जूनमध्ये कसोटी चॅम्पियनशीपचा अंतिम सामनाही खेळायचा आहे. हा सामना इंग्लंडमधील द ओव्हल मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. या सामन्यासाठी धोनीने निवृत्तीतून माघार घेऊन भारतासाठी खेळावे का, याबद्दलही शास्त्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

खरंतर भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचा गेल्या वर्षाच्या अखेरीस कार अपघात झाला, त्यातून सध्या तो सावरत आहे. पण त्यामुळे त्याला आता काही काळ क्रिकेटपासून दूर राहावे लागले आहे. पण कसोटी संघात पंतची कमी भारताला भासली.

फेब्रुवारी-मार्च महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत केएस भरतने यष्टीरक्षण केले, त्याने यष्टीरक्षणात कौशल्य दाखवले, पण त्याला फलंदाजीत कमाल करता आली नाही.

त्यामुळे धोनीचा विचार व्हायला हवा का, ज्याप्रकारे त्याची तंदुरुस्ती आहे, असा प्रश्न विचारल्यानंतर शास्त्री इएसपीएन क्रिकइन्फोशी बोलाताना शास्त्री म्हणाले, 'हो का नाही. त्याने देशातील अनेक यष्टीरक्षकांना दाखवले आहे की कशाप्रकारे यष्टीरक्षण केले जाते.'

तसेच धोनी कसोटी चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळण्यासाठी निवृत्तीतून माघार घेण्याचा गंभीरतेने विचार करेल का, असे विचारल्यावर शास्त्री यांनी सांगितले की धोनी त्याने घेतलेला निर्णय बदलत नाही. त्यामुळे याची शक्यता खूपच कमी आहे.

शास्त्री म्हणाले, 'नाही. एकदा धोनीने त्याच्या मनाशी पक्के ठरवले की ते पक्के असते. त्याने कसोटी क्रिकेट तेव्हा सोडले, जेव्हा तो आणखी एक ते दीड वर्षे सहज खेळू शकला असता. जर त्याने विक्रमांचा विचार केला असता, ज्याप्रमाणे आपल्या देशात होतो, तर त्याला 100 कसोटी खेळायला आवडले असते आणि एका चांगल्या सोहळ्यात, प्रेक्षकांसमोर सर्व छान होत असताना निवृत्ती घ्यायला आवडले असते. पण त्याला हे सर्व नको होते. तो असा व्यक्ती आहे, की जो नव्या व्यक्तीला वेळ येईल तेव्हा जबाबदारी देऊन बाजूला होईल.'

धोनीने 2014 च्या अखेरीसच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर त्याने विराट कोहलीकडे कसोटीचे नेतृत्व सोपवले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT