Ratan Tata Dainik Gomantak
क्रीडा

रतन टाटा राशिद खानला देणार कोट्यवधीचं बक्षीस? पाकिस्तानला पराभूत करण्यात निभावली महत्वाची भूमिका

Fact Check: अफगाणिस्तानने विश्वचषकाच्या सामन्यात पाकिस्तानला हरवून इतिहास रचला.

Manish Jadhav

Fact Check: अफगाणिस्तानने विश्वचषकाच्या सामन्यात पाकिस्तानला हरवून इतिहास रचला. अफगाणिस्तानने पहिल्यांदाच पाकिस्तानला हरवून मोठा उलटफेर केला. अफगाणिस्तानचा स्टार गोलंदाज राशिद खानने या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

या विजयानंतर सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल होत आहे की, रतन टाटा यांनी राशिद खानला 10 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. मात्र, आता रतन टाटा यांनी स्वतः ट्विट करुन या व्हायरल बातमीचे सत्यता सांगितली आहे.

जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?

अफगाणिस्तानच्या विजयानंतर व्हायरल होत असलेल्या बातम्यांनुसार, अफगाणिस्तानने विश्वचषकात पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर भारतीय ध्वज फडकावल्याबद्दल आयसीसीने क्रिकेटर राशिद खानला 55 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.

यानंतर रतन टाटा (Ratan Tata) यांनी रशीदला टाटा समूहाच्या वतीने 10 कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली. सोशल मीडियावर ही बातमी प्रचंड व्हायरल झाली. बातमी व्हायरल झाल्यानंतर रतन टाटा यांनी स्वत: त्यांच्या ट्विटर हँडलवर पोस्ट करत या बातमीची सत्यता सांगितली.

रतन टाटा यांनीच सत्य सांगितले

रतन टाटा यांनी ट्विट केले की, "मी आयसीसी किंवा कोणत्याही क्रिकेट संस्थेला कोणत्याही क्रिकेटपटूला दंड ठोठावण्याची सूचना केलेली नाही किंवा आम्ही बक्षीस जाहीर किंवा सुचवले नाही. माझा क्रिकेटशी काहीही संबंध नाही.''

ते पुढे म्हणाले की, 'माझ्या कोणत्याही अधिकृत प्लॅटफॉर्मवरुन कोणतीही माहिती आल्याशिवाय अशा व्हॉट्सअॅप फॉरवर्ड आणि व्हिडिओंवर विश्वास ठेवू नका.'

यावरुन टाटा समूहाकडून (Tata Group) कोणत्याही खेळाडूला बक्षीस जाहीर करण्यात आलेले नाही हे स्पष्ट झाले आहे. ही फक्त अफवा आहे आणि आणखी काही नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

SCROLL FOR NEXT