Goa Cricket  Dainik Gomantak
क्रीडा

Goa Ranji Trophy : गोव्यासमोर मातब्बर राजस्थानचे कडवे आव्हान; दोन्ही संघ देणार निर्णायक झुंज

पर्वरी येथील मैदानावर यंदा दुसरा चार दिवसीय सामना

दैनिक गोमंतक

पणजी: पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर तब्बल 35 महिन्यानंतर रणजी करंडक क्रिकेट पुनरागमन करेल. गोवा आणि राजस्थान यांच्यातील यंदाच्या स्पर्धेतील पहिला चार दिवसीय सामना मंगळवारपासून (ता. 13 ) या ठिकाणी खेळला जाईल.

( Ranji Trophy Cricket Tournament between Goa and Rajasthan will be played in porvorim)

पर्वरी येथे 27 ते 29 जानेवारी 2020 या कालावधीत गोवा व अरुणाचल प्रदेश यांच्यातील शेवटचा रणजी क्रिकेट सामना झाला होता. तेव्हा गोव्याने डाव व 336 धावांनी दणदणीत विजय मिळविला होता. मात्र कोविड महामारी व संबंधित निर्बंध यामुळे नंतर रणजी क्रिकेट मर्यादित स्वरुपात खेळले गेले, आणि गोव्यात एकही सामना झाला नाही. पर्वरीत तीन वर्षांपूर्वी राजस्थानने रणजी सामन्यात गोव्याला दहा विकेट राखून हरविले होते.

खेळपट्टीकडे लक्ष

पर्वरी येथील मैदानावर यंदा दुसरा चार दिवसीय सामना होत आहे. 26 ते 29 नोव्हेंबर या कालावधीत या मैदानावर 19 वर्षांखालील कुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेतील सामना झाला होता. तेव्हा मध्य प्रदेशने गोव्यावर डाव व 11 धावांनी विजय नोंदविला होता. ती खेळपट्टी राजस्थाविरुद्धच्या रणजी सामन्यासाठी वापरण्यात येणार नाही, असे जीसीए क्युरेटर सूर्यकांत नाईक यांनी सांगितले. रविवारी रात्री पाऊस झाला, मात्र सोमवारी ऊन पडल्यामुळे खेळपट्टीचे काम करता आले.

यजमानांच्या सरावावर परिणाम

रविवारी रात्री पडलेल्या पावसामुळे मैदानाच्या एका बाजूस असलेल्या सराव खेळपट्टीत पाणी झिरपले. त्याचा परिणाम गोव्याच्या फलंदाजी सरावावर झाला. सामनापूर्व फलंदाजी सरावाचा लाभ यजमान फलंदाजांना सोमवारी सकाळी मिळू शकला नाही.

राजस्थानचा संघ

अशोक मेणारिया (कर्णधार), अनिकेत चौधरी, महिपाल लोमरोर, रवी बिष्णोई, अभिजित तोमर, यश कोठारी, शुभम शर्मा, मानव सुथार, कमलेश नगरकोटी, झुबेर अली खान, कुणालसिंग राठोड, समर्पित जोशी, अराफत खान, सलमान खान, करण लांबा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Marathi language: हरवलेली अमृताची रसाळ वाणी अन् मराठीची दशा

Goa Fish Market: निविदाच नाही, मग 'सोपो' कर कसा? बोटमालक संघटनेचा सवाल, 'एसजीपीडीए' मार्केटमधील घोळ

Goa Elder Abuse: "वडिलांचा छळ करणाऱ्या मुलगा-सुनेला घरातून बाहेर काढा!" लंडनस्थित मुलीची थेट पोलिसांकडे आक्रमक मागणी

Tuyem Health Centre: तुये आरोग्य केंद्रातील कामे पूर्ण करा; नागरिक कृती समितीतर्फे आरोग्य विभागाला निवेदन

Wari: विठ्ठलनामाचा गजर, पंढरीकडे वारकऱ्यांची वाटचाल; पिळगाव येथून प्रथमच निघाली पायीवारी, महिलांसह एकूण 160 जणांचा सहभाग

SCROLL FOR NEXT