Chess Championhsip : आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत गोव्याच्या दियाला पाच पदके; दोन सुवर्ण, दोन रौप्य व एक कांस्य पदकारवर कोरले नाव

आज दाबोळी विमानतळावर दियाचे आगमन झाले
Chess Championhsip
Chess ChampionhsipDainik Gomantak

डगाव: श्रीलंकेत झालेल्या आशियाई स्कूल ब्लित्झ बुद्धिबळ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना दोन सुवर्ण पदकासह एकूण पाच आंतरराष्ट्रीय पदके मिळविणाऱ्या मडगाव येथील दिया दिगंबर सावळ हीचे आज दाबोळी विमानतळावर उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

( Diya Sawal of Goa won five medals in the Asian School Blitz Chess Tournament)

Chess Championhsip
ICC Test Championship: इंग्लंडच्या पाकिस्तानवरील विजयाने मोठे उलटफेर, जाणून घ्या टीम इंडियाची स्थिती

सावळ हिने 7 वर्षाखालील गटात वैयक्तिक व सांघिक अशा दोन सुवर्ण पदकांसह दोन रौप्य व एक कांस्य पदक प्राप्त केले होते. आज तिचे दाबोळी विमानतळावर आगमन झाल्यानंतर तिच्या स्वागतासाठी गोवा बुद्धिबळ संघटनेचे सचिव शरेंद्र नाईक, खजिनदार किशोर बांदेकर यांच्यासह समीर नाईक, ज्ञानेश्वर नाईक, सचिन आरोलकर, आशेष केणी, सुनील बाळ्ळीकर, पुंडलिक नायक, मुकेश अधिया, अनिल पाटील व दामोदर जांबावलीकर हे उपस्थित होते.

Chess Championhsip
Team India कडून तब्बल 12 वर्षांनी मिळणार कसोटी खेळण्याची संधी, गोलंदाज म्हणतोय...

भुवनेश्वर येथील राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत झाली निवड

ओडिशातील भुवनेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत गोव्याच्या दिया सावळ हिने मुलींत सुवर्ण कमावले , त्याचबरोबर खुल्या गटात एथन वाझ याने रौप्य, तर रुबेन कुलासो याने ब्राँझपदक जिंकले. या कामगिरीमुळे गोव्याचे तिन्ही बुद्धिबळपटू आशियाई आणि जागतिक शालेय बुद्धिबळ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यास पात्र ठरली होती. यानंतर दियाने पाच पदके आपल्या नावावर केली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com