Sandeep Sharma Daughter Dainik Gomantak
क्रीडा

लाडक्या बाबाचं लेकीला अप्रूप! CSK विरुद्ध संदीप शर्माला खेळताना पाहण्याऱ्या चिमुकलीचा Video Viral

संदीप शर्माच्या 8 महिन्यांच्या मुलीचा त्याला टीव्हीवर आयपीएल खेळताना पाहातानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Pranali Kodre

Sandeep Sharma’s daughter watches him play in against CSK: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत बुधवारी (12 एप्रिल) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात सामना पार पडला. एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात राजस्थानने केवळ 3 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात राजस्थानचा वेगवान गोलंदाज संदीप शर्माची कामगिरीही महत्त्वाची ठरली.

दरम्यान, तो हा सामना खेळत असताना त्याची 8 महिन्यांची मुलगी सोहानी त्याला टीव्हीवर पाहात असतानाचा एक गोड व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. संदीपची पत्नी ताशा शर्मा हिने इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला होता. त्या व्हिडिओला तिने कॅप्शन दिले होते की 'जेव्हा ती तिच्या बाबाला टीव्हीवर पाहाते. डॅडीज गर्ल.'

या व्हिडिओमध्ये दिसते की आईच्या मांडीवर बसलेली सोहानी टीव्हीमध्ये दिसणाऱ्या तिच्या बाबाकडे पाहून हसत आहे.

संदीप शर्माने या सामन्यात सीएसकेचा युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाडची विकेट घेतली होती. तसेच त्याने अखेरच्या षटकात सीएसकेला 21 धावांची गरज असताना आणि सीएसकेकडून एमएस धोनी व रविंद्र जडेजा फलंदाजी करत असताना गोलंदाजी केली होती.

त्याने पहिल्या तीन चेंडूंतच 14 धावा खर्च केल्यानंतर अखेरच्या तीन चेंडूंवर शानदार गोलंदाजी करत धोनी आणि जडेजा यांना मोठा फटका मारण्यापासून रोखले होते. त्यामुळे राजस्थानला या सामन्यात विजय मिळवता आला.

दरम्यान, संदीप शर्मा आयपीएल 2023 लिलावावेळी अनसोल्ड राहिला होता. त्याला कोणीही खरेदी केले नव्हते. मात्र, स्पर्धेच्या आधी राजस्थान रॉयल्सचा गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा दुखापतग्रस्त झाल्याने त्याचा बदली खेळाडू म्हणून संदीप शर्माला राजस्थानने संघात सामील करून घेतले.

संदीपने 2013 साली आयपीएलमध्ये पदार्पण केले असून त्याने पंजाब किंग्स, सनरायझर्स हैदराबाद आणि आता राजस्थान रॉयल्स संघाकडून सामने खेळले आहेत. त्याने आत्तापर्यत 106 आयपीएल सामने खेळले असून 26.31 च्या सरासरीने 116 विकेट्स घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: आधी कौतुकाची थाप, मग दिला धक्का! डॅरिल मिचेलच्या शतकानंतर कोहलीने नेमकं काय केलं? पाहा व्हायरल व्हिडिओ

छ. संभाजी महाराजांनी सांत इस्तेव्हांव किल्ल्यावर हल्ला केला, पोर्तुगिजांना समजायच्या आत जुवे किल्ला घेतला; गोव्यावर औरंगजेबाची वक्रदृष्टी

Russian Tourist Murder: 'त्या' रशियन महिलांचा खून पैशासाठीच, राग आल्यावर 'आलेक्सेई' महिलांना टार्गेट करायचा; तपासात धक्कादायक माहिती समोर

Robbery Attempt: होंडा येथील नवनाथ मंदिरातील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न

Yashasvi Jaiswal: यशस्वी जयस्वालचा पारा चढला? ध्रुव जुरेलच्या कानाखाली मारायला गेला, नक्की काय घडलं? Watch Video

SCROLL FOR NEXT