R Ashwin Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: अंपायर दवामुळे बॉल बदलू शकतात का? अश्विननेही विचारला प्रश्न; नक्की भानगड काय, घ्या जाणून

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात झालेल्या सामन्यादरम्यान पंचांनी दवामुळे चेंडू बदलला होता, याबद्दल अश्विनने प्रश्न विचारला आहे.

Pranali Kodre

Chennai Super Kings vs Rajasthan Royals: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेच्या 18 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने चेन्नई सुपर किंग्स संघाविरुद्ध 3 धावांनी विजय मिळवला. चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर हा सामना झाला होता. दरम्यान, या सामन्यात राजस्थान गोलंदाजी करत असताना पंचांनी मैदानातील दवामुळे चेंडू बदलला होता. याबद्दल आर अश्विनने आश्चर्य व्यक्त केले आहे.

या सामन्यानंतर अश्विन म्हणाला, 'पंचांनी त्यांच्या मर्जीनेच दवामुळे चेंडू बदलल्याने मी थोडा चकीत झालो. यापूर्वी असे कधीही झालेले मी पाहिले नाही आणि त्यामुळे मला आश्चर्य वाटले. खरं सांगायचे तर यावर्षीच्या आयपीएलमधील काही निर्णयांनी मला गोंधळात टाकले आहे. मला म्हणायचे आहे की मी आश्चर्यचकीत आहे की यामुळे चांगले किंवा वाईट निकाल लागू शकतात. कारण मला वाटते की तुम्हाला थोडा समतोलपणा साधणे गरजेचे आहे.'

अश्विन म्हणाला, 'एक गोलंदाजी करणारा संघ म्हणून आम्ही चेंडू बदलण्यास सांगितले नव्हते. पण चेंडू पंचांनी त्यांच्या मर्जीने बदलला. मी पंचांना याबद्दल विचारले आणि ते म्हणाले, आम्ही चेंडू बदलू शकतो. त्यामुळे मी आशा करतो की या हंगामात पुढे जेव्हाही दव असेल, तेव्हा ते प्रत्येकवेळी ते चेंडू बदलतील. कारण तुम्ही तुम्हाला हवे ते करू शकता. पण तुम्हाला काही मानके निश्चित करणे आवश्यक आहे.'

या सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 175 धावा केल्या होत्या. त्यानंतर १७६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सीएसकेला 20 षटकात 6 बाद 172 धावाच करता आल्या. या सामन्यात अश्विनने शानदार गोलंदाजी करताना 4 षटकात 25 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. तसेच फलंदाजी करताना त्याने 30 धावांची खेळी केली. यामुळे त्याला या सामन्याचा सामनावीर पुरस्कारही देण्यात आला.

नियम काय सांगतो?

खरंतर अश्विनने चेंडू बदलण्यावर प्रश्न उपस्थित केल्यानंतर अनेकांना प्रश्न पडला असेल की नक्की नियम सांगतो काय? पण अनेक स्पर्धांच्या नियमानुसार आयपीएलमध्येही पंच परस्पर सहमतीने निर्णय घेऊन चेंडू बदलू शकतात. त्यासाठी त्यांना क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने किंवा कर्णधाराने तक्रार करण्याची प्रतिक्षा करण्याची गरज नसते.

IPL Playing Condition

आयपीएलच्या नियमानुसार जर सामना सुरू असताना चेंडू सापडला नाही किंवा नीट होऊ शकत नसेल किंवा पंच सहमत असतील की तो चेंडू सर्वसाधारणपणे वापरात येण्याच्या स्थितीत नाही, तर पंच चेंडू बदलू शकतात, पण पूर्वीच्या चेंडूशी त्या चेंडूची तुलना झाली पाहिजे. चेंडू बदल्यानंतर पंचांनी फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला याबद्दल माहिती द्यायला हवी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT