Shreyas Iyer Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: ऑस्ट्रेलियाचा कठीण पेपर सोडवण्यासाठी श्रेयस अय्यरकडून द्रविड करुन घेतोय 'असा' सराव

Shreyas Iyer: ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्डकप 2023 मधील पहिला सामना खेळण्यापूर्वी राहुल द्रविडने श्रेयस अय्यरकडून विशेष सराव करून घेतला.

Pranali Kodre

Rahul Dravid's special bouncer practice for Shreyas Iyer ahead of India vs Australia ODI Cricket World Cup 2023 match at Chennai:

वर्ल्डकप 2023 स्पर्धेला सुरुवात झाली असून भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. हा सामना 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघ जोरदार तयारी करत आहे. दरम्यान, भारतीय संघाच्या सरावावेळी प्रशिक्षक राहुल द्रविडने श्रेयस अय्यरकडून विशेष सराव करून घेतला.

चेन्नईतील खेळपट्टीवर अनेकदा चेंडूला उसळी मिळते. त्याचमुळे श्रेयसकडून उसळत्या चेंडूंचा सराव करून घेण्यात आला. श्रेयस हा फिरकी गोलंदाजीविरुद्ध चांगला खेळ करतो. त्याचे फिरकी गोलंदाजीविरुद्ध तंत्रही चांगले आहे. मात्र, आखुड टप्प्याच्या चेंडू त्याला बऱ्याचदा त्रासदायक ठरतात. तो अशा उसळी घेणाऱ्यां चेंडूवर संघर्ष करतानाही दिसतो.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलियाकडे मिचेल स्टार्क, जोश हेजलवूड, पॅट कमिन्स हे उसळणारे चेंडू टाकणारे वेगवान गोलंदाज आहेत. हीच गोष्ट लक्षात घेता श्रेयस अय्यरकडून द्रविडने सराव करून घेतला.

मीडियातील रिपोर्ट्सनुसार श्रेयसने बराचवेळ उसळत्या चेंडूंचा सामना करण्याचा सराव केला. यावेळी त्याला थ्रोडाऊन तज्ञांनी विविध पद्धतीने चेंडू टाकले. तसेच मोहम्म शमी, शार्दुल ठाकूर आणि हार्दिक पंड्या यांनीही उसळते चेंडू टाकले.

याशिवाय राहुल द्रविडने खेळपट्टीच्या मध्ये उभे राहुल टेनिस रॅकेटने चेंडू टाकत सातत्याने उसळते चेंडू श्रेयस विरुद्ध टाकले. यावेळी श्रेयस पॅड आणि ग्लव्ह्जशिवाय मैदानात होता, तसेच त्याने फक्त हेल्मेट घातले होते. द्रविडबरोबरचा हा सराव साधारण २० मिनिट झाला.

श्रेयस आहे चांगल्या लयीत

दरम्यान, पाठीच्या दुखापतीतून सावरल्यानंतर श्रेयसने भारतीय संघाकडून पुनरागमन केले आहे. तो वर्ल्डकप 2023 पूर्वी झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळला होता. तसेच त्याने या मालिकेत शतकही ठोकले होते. त्यामुळे त्याचा सध्याचा फॉर्म चांगला असून त्याकडून वर्ल्डकपमध्येही चांगल्या कामगिरीची अपेक्षा केली जात आहे.

गिलच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह

दरम्यान, भारताचा सलामीवीर शुभमन गिलला डेंग्यू झाला असल्याचे निष्पण्ण झाले आहे. त्यामुळे वर्ल्डकपमधील ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जर तो पूर्ण सावरला नाही, तर त्याला पहिल्याच सामन्याला मुकावे लागू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hardik Pandya Video: हार्दिकच्या धडाकेबाज खेळीवर गर्लफ्रेंड फिदा! सोशल मीडियावर रंगली 'फ्लाइंग किस'ची चर्चा; मैदानावरच प्रेमाचा वर्षाव

IND vs SA 5th T20: अहमदाबादमध्ये हार्दिक पांड्याचं वादळ, 16 चेंडूत ठोकलं अर्धशतक; अभिषेक शर्माचा मोडला रेकॉर्ड VIDEO

..तांबडया समुद्रातून बेट मागे टाकल्यावर बोट 'सुएझ कालव्या'त शिरली! गोव्यासाठी लढलेल्या वीरांच्या कारावासातल्या भयाण आठवणी

U19 Asia Cup 2025: भारताचा श्रीलंकेला विजयाचा 'धोबीपछाड'; फायनलमध्ये रंगणार भारत-पाक हायव्होल्टेज थरार! VIDEO

Rahu Gemstone: राहुची महादशा अन् गोमेद रत्नाचा चमत्कार! 'या' 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार; जाणून घ्या फायदे आणि महत्त्वाचे नियम

SCROLL FOR NEXT