Rahul Dravid ICC Chennai And Ahmedabad Pitch Rating Dainik Gomantak
क्रीडा

Cricket World Cup: "फक्त चौकार आणि षटकारच पाहायचे असतील तर...", आयसीसीवर द्रविड संतापला

Rahul Dravid On ICC Pitch Rating: आयसीसीला फटकारताना द्रविड म्हणाला की, त्याला स्पर्धेत विविधता पहायची आहे आणि खेळपट्ट्या केवळ धावांच्या आधारावर रेट करता येत नाहीत.

Ashutosh Masgaunde

Rahul Dravid has not agreed with the ICC's decision to give 'average' rating to some pitches in the World Cup:

भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हे विश्वचषकातील काही खेळपट्ट्यांना 'सरासरी' रेटिंग देण्याच्या आयसीसीच्या निर्णयाशी सहमत नाहीत. द्रविड म्हणाला की, केवळ जास्त धावा करणे ही खेळपट्ट्यांना रेटिंग देण्याची पात्रता असू शकत नाही.

आयसीसीने चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममधील खेळपट्ट्यांना 'सरासरी' रेटिंग दिले आहे, जिथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारता यांच्यात सामना झाला होता. तर अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवरील खेळपट्ट्यांनाही आयसीसीने सरासरी रेटिंग दिले आहे.

द्रविड म्हणाला की, त्याला स्पर्धेत विविधता पहायची आहे आणि खेळपट्ट्या केवळ धावांच्या आधारावर रेट करता येत नाहीत.

फक्त 350 धावा होणारे पिचेस चांगले ?

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याच्या पूर्वसंध्येला द्रविड म्हणाला, 'त्या दोन पिचेससाठी दिलेल्या सरासरी रेटिंगशी मी नक्कीच आदरपूर्वक असहमत आहे.

मला वाटते ते चांगले पिच होते. जर तुम्हाला फक्त 350 धावा बघायच्या असतील आणि फक्त धावा होणारे पिचेसच चांगले मानायचे असतील, तर मी त्याच्याशी असहमत आहे.

मला वाटते की, तुम्हाला वेगवेगळ्या कौशल्यांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. फक्त चौकार आणि षटकार पाहायचे असतील, तर त्यासाठी टी-२० क्रिकेटही आहे.

कौशल्यांचा खेळ

द्रविड म्हणाला, 'मी याच्याशी असहमत आहे कारण मला वाटते की आपण सर्व कौशल्ये, स्ट्राईक रोटेट करण्याची क्षमता यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

जडेजाची दर्जेदार गोलंदाजी, सँटनरची गोलंदाजी किंवा झाम्पाची गोलंदाजी किंवा मधल्या षटकांमध्ये केन विल्यमसनची स्ट्राइक रोटेट करण्याची क्षमता. तसेच विराट कोहली आणि केएल राहुल यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ज्या पद्धतीने फलंदाजी केली. ती कौशल्ये आहेत.

द्रविडने आपले म्हणणे सिद्ध करण्यासाठी काही उदाहरणेही दिली. तो म्हणाला, 'मी एक उदाहरण देतो. मला माहित नाही की, त्या पिचेसचे रेटिंग काय होते पण आम्ही ऑस्ट्रेलियात T20 विश्वचषक खेळलो.

पर्थमध्ये आम्ही 138 धावांचे पिच पाहिले. त्यावेळी भारत दक्षिण आफ्रिकेशी खेळला आणि जवळजवळ प्रत्येक चेंडू सीम आणि स्विंग झाला. तो टी-२० सामना होता. मला माहित नाही की त्याला काय रेटिंग दिले गेले. मला आशा आहे की त्याला सरासरी रेटिंग देखील दिले गेले असावे.

T20 मध्येही कमी धावा होतात

द्रविड पुढे म्हणाला, टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तान इंग्लंडविरुद्ध खेळला आणि 130 धावा केल्या. त्याबद्दल माझी तक्रार नाही. मला वाटते की ते चांगले आहे, ते छान आहे.

पर्थचे ते पिच चांगले होते. यामध्ये विविध कौशल्यांना आव्हान देण्यात आले. त्यात खेळाडूंची विविध कौशल्ये पाहाण्यास मिळाली. आम्ही ते सामने गमावले तरीही मी हे सांगत आहे. त्यामुळे यामध्ये कोणतीही अडचण नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT