Rahul Dravid  Daini Gomantak
क्रीडा

राहुल द्रविड बनला टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक

T20 विश्वचषकानंतर (T20 World Cup) राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारणार आहे.

Manish Jadhav

माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज असणाऱ्या राहुल द्रविडची (Rahul Dravid) टीम इंडियाच्या (Team India) मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. बुधवारी क्रिकेट सल्लागार समितीने राहुल द्रविडची मुख्य प्रशिक्षकपदी एकमताने निवड केली. T20 विश्वचषकानंतर राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारणार आहे. T20 विश्वचषकानंतर रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा कार्यकाळ संपणार असून आता द्रविडच्या मार्गदर्शनाखाली संघ पुढे जाणार आहे. राहुल द्रविड भारत-न्यूझीलंड मालिकेपासून प्रशिक्षकपदाची सुरुवात करणार आहे.

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक बनल्यानंतर राहुल द्रविडने सांगितले की, 'हे पद मिळणे हा माझ्यासाठी सन्मानजनक आहे. तसेच या भूमिकेसाठी मी तयार आहे.'

द्रविड पुढे म्हणाला, 'टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षकपद मिळणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट असून मी ही जबाबदारी घेण्यास तयार आहे. रवी शास्त्रींच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने चांगली कामगिरी केली असून मी संघाला पुढे नेण्याची आशा करतो. मी NCA, U-19 आणि India A मधील बहुतेक खेळाडूंसोबत काम केले आहे. मला माहित आहे की, सर्व खेळाडूंमध्ये उत्कटता आहे आणि त्यांना दररोज स्वत: ला सुधारायचे आहे. पुढील दोन वर्षांत अनेक मोठ्या स्पर्धा येत असून त्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करण्याचे आमचे ध्येय असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

Paroda Murder Case: पारोड्यात महिलेचा अज्ञाताकडून खून! संशयित कामगाराचा शोध सुरू

एकाच दिवशी Cash For Job मधील ठकसेनांना जामीन! तक्रारदारांची मात्र चिंता संपेना

SCROLL FOR NEXT