Rafael Nadal X/usopen
क्रीडा

Rafael Nadal: नदालच्या फ्रेंच ओपन 2007 विनिंग रॅकेटचा 'इतक्या' किंमतीला झाला लिलाव; फेडरर-जोकोविचाला केलेलं पराभूत

Rafael Nadal French Open: नदालने जोकोविच आणि फेडरर यांच्याविरुद्ध 2007 फ्रेंच ओपनमध्ये वापरलेल्या रॅकेटचा लिलाव करण्यात आला आहे.

Pranali Kodre

Rafael Nadal 2007 French Open winning racquet Sold at auction:

स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदालने आत्तापर्यंत अनेक विजेतीपदं मिळवली आहेत. त्यात २००७ साली त्याने जिंकलेल्या फ्रेंच ओपन विजेतेपदाचाही समावेश आहे. दरम्यान, त्याने ही स्पर्धा जिंकताना अंतिम सामन्यात वापरलेल्या रॅकेटचा लिलाव करण्यात आला आहे.

सोमवारी त्याच्या रॅकेटचा लिलावा झाला, ज्यासाठी 118,206 डॉलरची बोली लागली आहे. नदालने 2007 सालच्या फ्रेंच ओपनमध्ये अंतिम सामन्यात दिग्गज रॉजर फेडररला 6-3, 4-6, 6-3, 6-4 अशा चार सेटमध्ये पराभूत केले होते. यासह त्याने कारकिर्दीतील तिसरे ग्रँडस्लॅम जिंकले होते.

इतकेच नाही, तर नदालने ही रॅकेट त्या स्पर्धेत त्याआधीही वापरली होती. त्याने उपांत्य फेरीत नोवाक जोकोविचविरुद्ध खेळतानाही ही रॅकेट वापरली होती.

त्याची ही रॅकेटचा लिलाव होण्यापूर्वी ती ऑस्ट्रेलियन टेनिस म्युझीयमच्या संग्रहात होती. या रॅकेटला प्रेस्टिज मेमोराबिलाच्या ऑनलाईन लिलावात 118,206 डॉलरची रक्कम मिळाली.

दरम्यान, लिलाव होणारी नदालची ही तिसऱ्या क्रमांकाची सर्वात महागडी रॅकेट ठरली आहे.

यापूर्वी नदालचीच ऑस्ट्रेलियन ओपन 2022 स्पर्धेत वापरलेल्या रॅकेटचा 139,700 डॉलरला लिलाव झाला होता, तर बिली जीन किंगच्या 'बॅटल ऑफ सेक्सेस' रॅकेटचा 125,000 डॉलरला लिलाव झाला होता.

नदाल तंदुरुस्तीसाठी करतोय प्रयत्न

३७ वर्षीय नदालने काही दिवसांपूर्वीच 2023 ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेनंतर तब्बल एक वर्षाने ब्रिस्बेन इंटरनॅशनल 2024 स्पर्धेतून पुनरागमन केले होते.

मात्र तो पुन्हा एकदा या स्पर्धेदरम्यान दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलियन ओपन 2024 स्पर्धेलाही मुकावे लागले. आता तो फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या दोहामध्ये एटीपी 250 स्पर्धेतून पुनरागमन करण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT