Youvraj Singh with Yuzvendra Chahal
Youvraj Singh with Yuzvendra Chahal  Dainik Gomantak
क्रीडा

'या' प्रकरणी 'युवराज सिंगला' अटक आणि जामीन

Dainik Gomantak

Racism Crime: क्रिकेटर युवराज सिंगला (Former Cricketer Youvraj Singh) अनुसूचित जातीविरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल पोलिसांनी रविवारी अटक (Arrest) केली. त्याला हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील हांसी येथे (Hansi, Dist. Hissar) अटक करण्यात आली. मात्र, त्याची औपचारिक जामिनावर सुटका (Release on bail) करण्यात आली. युवराज सिंगने गेल्या वर्षी रोहित शर्मासोबत (Rohit Sharma) लाइव्ह चॅटमध्ये युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) विषयी बोलताना जातीबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप आहे.

हंसी पोलिस डीएसपी विनोद शंकर यांनी सांगितले की, क्रिकेटपटू युवराज सिंगला या प्रकरणाच्या तपासात सामील झाल्यामुळे अटक करण्यात आली आहे. यापूर्वीही दोनदा त्याला तपासात समाविष्ट करण्यात आले आहे. पोलिसांनी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई केली आणि युवराजची जामिनावर सुटका केली.

पोलिसांनी युवराजचा मोबाईल जप्त केला

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका विशिष्ट वर्गावर भाष्य करण्याच्या संदर्भात पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांनी युवराजचा मोबाईल जप्त केला आहे. हंसी पोलीस आता युवराज सिंगच्या विरोधात न्यायालयात चालान सादर करणार आहे. यानंतर युवराजला विशेष न्यायालयाकडून नियमित जामीन मिळवावा लागेल. युवराजला प्रत्येक तारखेला हिसार येथील एससी/एसटी अत्याचार कायद्यांतर्गत स्थापन केलेल्या विशेष न्यायालयात हजर राहावे लागेल. दोषी ठरल्यास त्याला या प्रकरणात 5 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.

क्रिकेटपटू युवराज सिंगने गेल्या वर्षी युझवेंद्र चहलसोबत इंस्टाग्रामवर व्हिडिओ चॅटिंग करताना दलित समाजाबद्दल अपमानास्पद शेरेबाजी केली होती. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रकरणी रजत कलसन यांच्या तक्रारीवरून हांसी पोलिसांनी युवराज सिंगविरोधात एससी/एसटी ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. युवराज सिंगने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात याचिका दाखल करून हे प्रकरण निकाली काढावे. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान, उच्च न्यायालयाने युवराज सिंगवर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश हरियाणा पोलिसांना दिले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

Canada PM Justine Trudeau: जस्टिन ट्रुडो यांच्यासमोर 'खलिस्तानी घोषणा'; भारताने कॅनडाच्या राजदूताला बोलावून नोंदवला निषेध

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT