Rachin Ravindra 
क्रीडा

Rachin Ravindra: 23 व्या वर्षीच रचिनने गाठली नवी उंची, सचिनला मागे टाकत रचला मोठा वर्ल्ड रेकॉर्ड

World Cup 2023: रचिनने वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत सर्वाधिक धावा करत मोठा पराक्रम केला आहे.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, New Zealand vs Sri Lanka, Rachin Ravindra Record:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत गुरुवारी (10 ऑक्टोबर) न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका संघात सामना झाला. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने 5 विकेट्सने विजय मिळवला. न्यूझीलंडच्या या विजयात 23 वर्षीय रचिन रविंद्रचेही योगदान महत्त्वाचे ठरले.

या सामन्यात श्रीलंकेने दिलेल्या 172 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रचिन रविंद्रने सलामीला डेवॉन कॉनवेसह 86 धावांची भागीदारी केली. त्याने 34 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांसह 42 धावांची खेळी केली.

या खेळीसह आता रचिन वर्ल्डकप 2023 स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. विशेष म्हणजे हा त्याचा कारकिर्दीतील पहिलाच वर्ल्डकप असून त्याने ५०० धावांचा टप्पा पार केला आहे. त्याच्या नावावर आता वर्ल्डकप 2023 स्पर्धेत 9 डावाच 70.62 च्या सरासरीने 565 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या तीन शतकांचा समावेश आहे.

मास्टर-ब्लास्टरला टाकले मागे

रचिन वयाची 25 वर्षे पूर्ण करण्यापूर्वी एका वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर आला आहे. त्याने याबाबतीत मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. सचिनने 1996 वर्ल्डकपमध्ये वयाची 25 वर्षे पूर्ण करण्यापूर्वी ७ डावात 523 धावा केल्या होत्या.

पहिल्याच वर्ल्डकपमध्ये पाडली छाप

रचिन कारकिर्दीतील पहिल्याच वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणाराही फलंदाज ठरला आहे. त्याने जॉनी बेअरस्टोने 2019 वर्ल्डकपमध्ये केलेल्या 532 धावांच्या विक्रमाला मागे टाकले आहे. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा बाबर आझम आहे. त्याने 2019 वर्ल्डकपमध्ये 474 धावा केल्या होत्या.

  • पहिल्या वर्ल्डकप 2023 स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटपटू -

    • 565 धावा - रचिन रविंद्र (2023)

    • 532 धावा - जॉनी बेअरस्टो (2019)

    • 474 धावा - बाबर आझम (2019)

    • 465 धावा - बेन स्टोक्स (2019)

    • 461 धावा - राहुल द्रविड (1999)

न्यूझीलंडचा विजय

सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर रचिन व्यतिरिक्त न्यूझीलंडकडून डेवॉन कॉनवेने 45 धावांची खेळी केली, तर डॅरिल मिचेलने 43 धावांची खेळी केली. त्यामुळे न्यूझीलंडने 172 धावांचे आव्हान 23.2 षटकातच पूर्ण केले.

श्रीलंकेकडून श्रीलंकेकडून अँजेलो मॅथ्यूजने 2 विकेट्स घेतल्या, तसेच दुश्मंता चमीरा आणि महिश तिक्षणा यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतली.

तत्पूर्वी श्रीलंकेकडून फलंदाजी करताना कुशल परेराने 51 धावांची खेळी केली, तसेच महिश तिक्षणाने 38 धावांची खेळी केली. मात्र, अन्य कोणालाही 20 धावांचा टप्पा पार करता आला नाही. त्यामुळे श्रीलंकेचा संघ 46.4 षटकात 171 धावांवर सर्वबाद झाला.

न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने 3 विकेट्स घेतल्या. तसेच लॉकी फर्ग्युसन, मिचेल सँटेनर आणि रचिन रविंद्र यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतली, तर टीम साऊथीने 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT