R Ashwin and Yashasvi Jaiswal Dainik Gomantak
क्रीडा

IND vs ENG: धरमशालेत अश्विन-जयस्वाल रचणार इतिहास? दिग्गजांना मागे टाकत नवे विक्रम करण्याची संधी

R Ashwin and Yashasvi Jaiswal: इंग्लंडविरुद्ध धरमशाला येथे होणाऱ्या पाचव्या कसोटी सामन्यात भारताच्या आर अश्विन आणि यशस्वी जयस्वाल यांना मोठ्या विक्रमांना गवसणी घालण्याची संधी असणार आहे.

Pranali Kodre

R Ashwin and Yashasvi Jaiswal eye on historic feat in India vs England Dharamsala Test

भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना धरमशाला येथे 7 मार्चपासून सुरू होणार आहे. या सामन्यादरम्यान भारताच्या आर अश्विन आणि यशस्वी जयस्वालला मोठा विक्रम करण्याची संधी असणार आहे.

या सामन्यातील एका जरी डावात आर अश्विनने पाच किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या, तर अश्विन कसोटीत सर्वाधिक वेळा एका डावात 5 विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अनिल कुंबळेला मागे टाकेल आणि सर रिचर्ड हॅडली यांची बरोबरी करेल. तसेच तो कसोटीत सर्वाधिक वेळा एका डावात 5 विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाजही बनेल.

सध्या अश्विनच्या नावावर 35 वेळा कसोटीत एका डावात 5 विकेट्स घेण्याचा विक्रम आहे. अनिल कुंबळेनेही कसोटीत 35 वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत, तर हॅडली यांनी 36 वेळा कसोटीत 5 विकेट्स घेतल्या आहेत.

कसोटीत सर्वाधिकवेळा डावात 5 विकेट्स घेणारे गोलंदाज (6 मार्च 2024 पर्यंत)

  • 67 वेळा- मुथय्या मुरलीधरन

  • 37 वेळा - शेन वॉर्न

  • 36 वेळा - सर रिचर्ड हॅडली

  • 35 वेळा - आर अश्विन

  • 35वेळा - अनिल कुंबळे

  • 34 वेळा - रंगना हेराथ

अश्विनचा 100 वा सामना

अश्विनसाठी धरमशालेत होणारा इंग्लंडविरुद्धचा पाचवा सामना खास असणार आहे. कारण हा त्याचा कारकिर्दीतील 100 वा कसोटी सामना असेल. तो 100 कसोटी सामने खेळणारा भारताचा 14 वा खेळाडू असणार आहे.

यापूर्वी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, अनिल कुंबळे, कपिल देव, सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, सौरव गांगुली, विराट कोहली, इशांत शर्मा, हरभजन सिंग, चेतेश्वर पुजारा आणि वीरेंद्र सेहवाग या भारतीय क्रिकेटपटूंनी 100 कसोटी सामने खेळले आहेत.

जयस्वालही करू शकतो विक्रम

धरमशाला कसोटीत यशस्वी जयस्वालने 120 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या, तर तो एका द्विपक्षीय कसोटी मालिकेत भारताकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरेल. जयस्वाल सुनील गावसकर आणि विराट कोहली यांना मागे टाकेल.

सध्या चालू असलेल्या कसोटी मालिकेत जयस्वालने 4 सामन्यात 655 धावा केल्या आहेत. तसेच सध्या एका द्विपक्षीय कसोटी मालिकेत भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सुनील गावसकरांच्या नावावर आहे. त्यांनी 1971 साली वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत 4 सामन्यांत 774 धावा केल्या होत्या.

तसेच 1978-79 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत 6 सामन्यांत 732 धावा केल्या होत्या. तसेच 2014-15 साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत विराट कोहलीने 4 सामन्यांत 692 धावा केल्या होत्या. तसेच विराटने 2016 साली झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 5 सामन्यांत 655 धावा केल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बाजारात नाताळची धूम! ख्रिसमस ट्री, सजावट साहित्याची खरेदी जोरात; ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खास ऑफर

ED Raid Goa: जमीन हडप प्रकरण: 'मॉडेल्स' कंपनीवर ईडीचे छापे, दुबईतील मालमत्तेचे पुरावे जप्त

Jasprit Bumrah Angry: बुमराहचा पारा चढला! चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि फेकून दिला Watch Video

Rooftop Solar: राज्यातील 798 ग्राहकांना शून्‍य रुपये वीज बिल; 1,304 घरांच्‍या छतांवर 'रुफ टॉप सोलर'

PF Withdrawal: EPFO चा ऐतिहासिक निर्णय: आता PF चे पैसे थेट ATM आणि UPI द्वारे काढता येणार!

SCROLL FOR NEXT