R Ashwin 100 Wickets Against England AFP
क्रीडा

IND vs ENG: बेअरस्टोला आऊट करताच अश्विनने रचला इतिहास! कसोटीत 'हा' पराक्रम करणारा पहिलाच आशियाई गोलंदाज

R Ashwin Test Record against England: आर अश्विनने रांचीत चालू असलेल्या कसोटीत इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोला बाद करत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

Pranali Kodre

R Ashwin record during India vs England 4th Test in Ranchi:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात शुक्रवारपासून (23 फेब्रुवारी) कसोटी मालिकेतील चौथा सामना सुरू झाला आहे. या सामन्यात गोलंदाजी करताना भारताचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विनने एक मोठा विक्रम केला आहे.

या सामन्यात अश्विनने 22 व्या षटकात जॉनी बेअरस्टोला 38 धावांवर बाद केले. ही अश्विनची इंग्लंडविरुद्धची कसोटीतील 100 वी विकेट ठरली. तो इंग्लंडविरुद्ध कसोटीत 100 विकेट्स घेणारा भारताचा पहिलाच गोलंदाज ठरला आहे.

इंग्लंडविरुद्ध कसोटीत 100 विकेट्स घेणारे भारतीय (23 फेब्रुवारी 2024 पर्यंत)

  • 100 विकेट्स - आर अश्विन (23 सामने)

  • 95 विकेट्स - भागवत चंद्रशेखर (23 सामने)

  • 92 विकेट्स - अनिल कुंबळे (19 सामने)

  • 85 विकेट्स - बिशन सिंग बेदी (22 सामने)

  • 85 विकेट्स - कपिल देव (27 सामने)

दिग्गजांच्या यादीत अश्विनने मिळवले स्थान

दरम्यान, अश्विनने इंग्लंडविरुद्ध फलंदाजी करताना कसोटीत 1000 पेक्षा अधिक धावाही केलेल्या आहेत. त्यामुळे तो एकाच प्रतिस्पर्धीविरुद्ध कसोटीत 1000 धावा आणि 100 विकेट्स घेणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत सामील झाला आहे.

यापूर्वी असा विक्रम जॉर्ज जिफेन, मॉन्टी नोबल, विलफ्रेड ऱ्होड्स, गॅरी सोबर्स, इयान बॉथम आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनी केला आहे. दरम्यान, हा कारनामा करणारा अश्विन आशिया खंडातील पहिलाच गोलंदाज आहे.

एकाच प्रतिस्पर्धीविरुद्ध कसोटीत 1000 धावा आणि 100 विकेट्स घेणारे गोलंदाज

  • जॉर्ज जिफेन - विरुद्ध इंग्लंड

  • मॉन्टी नोबल - विरुद्ध इंग्लंड

  • विलफ्रेड ऱ्होड्स - विरुद्ध ऑस्ट्रेलिया

  • गॅरी सोबर्स - विरुद्ध इंग्लंड

  • इयान बॉथम - विरुद्ध ऑस्ट्रेलिया

  • स्टुअर्ट ब्रॉड - विरुद्ध ऑस्ट्रेलिया

  • आर अश्विन - विरुद्ध इंग्लंड

सर्वाधिक प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध 100 विकेट्स घेणारे गोलंदाज

दरम्यान, अश्विनने इंग्लंडपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 100 कसोटी विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे सर्वाधिक प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध 100 कसोटी विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत त्याने लान्स गिब्स, कर्टनी वॉल्श, कर्टली अँब्रोस, ग्लेन मॅकग्रा आणि नॅथन लायन यांची बरोबरी केली आहे. या खेळाडूंनीही दोन संघांविरुद्ध 100 विकेट्स घेतल्या आहेत.

दरम्यान मुथय्या मुरलीधरन, शेन वॉर्न आणि जेम्स अँडरसन या खेळाडूंनी तीन देशांविरुद्ध कसोटीत 100 विकेट्स घेतल्या आहेत.

सर्वाधिक प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध 100 कसोटी विकेट्स घेणारे गोलंदाज -

  • 3 - मुथय्या मुरलीधरन (विरुद्ध - इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, भारत)

  • 3 - शेन वॉर्न (विरुद्ध - इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड)

  • 3 - जेम्स अँडरसन (विरुद्ध - भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका)

  • 2 - लान्स गिब्स (विरुद्ध - ऑस्ट्रेलिया, इंग्लंड)

  • 2 - कर्टनी वॉल्श (विरुद्ध - ऑस्ट्रेलिया, इंग्लंड)

  • 2 - कर्टली अँब्रोस (विरुद्ध - ऑस्ट्रेलिया, इंग्लंड)

  • 2 - ग्लेन मॅकग्रा (विरुद्ध - इंग्लंड, वेस्ट इंडिज)

  • 2 - नॅथन लायन (विरुद्ध - इंग्लंड, भारत)

  • 2 - आर अश्विन (विरुद्ध - ऑस्ट्रेलिया, इंग्लंड)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT