Quinton de Kock  ICC
क्रीडा

Quinton de Kock: पराभवाचं दु:ख मनात साठवत भरल्या डोळ्यांनी डी कॉकने घेतला वनडे क्रिकेटचा निरोप

Pranali Kodre

Quinton de Kock retires from ODI Cricket:

गुरुवारी (16 नोव्हेंबर) वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला 3 विकेट्सने पराभूत केले. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तब्बल आठव्यांदा वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला.

तथापि, या सामन्यानंतर दक्षिण आफ्रिका संघात मात्र निराशेचे वातावरण होते. सामना पराभूत झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना पराभवाचे दु:ख लपवता आले नाही. क्विंटन डी कॉक, एडेन मार्करम, गेराल्ड कोएट्झी, हेन्रिक क्लासेन यांच्यासह अनेक खेळाडूंच्या चेहऱ्यावरही निराशा सामन्यानंतर स्पष्ट दिसली.

दरम्यान, हा सामना क्विंटन डी कॉकचा अखेरचा वनडे सामना ठरला. त्याने या वर्ल्डकपच्या आधीच स्पष्ट केले होते की तो या स्पर्धेनंतर वनडेतून निवृत्ती घेणार आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचे वर्ल्डकप 2023 मधील आव्हान उपांत्य फेरीत संपल्यानंतर त्याच्या वनडे कारकिर्दीचीही अखेर झाली.

विशेष म्हणजे डी कॉकने वर्ल्डकप 2023 स्पर्धेत शानदार कामगिरी करत वनडे क्रिकेटचा निरोप घेतला. त्याने या स्पर्धेत 10 सामन्यांत 59.40 च्या सरासरीने 594 धावा केल्या. यात त्याच्या 4 शतकांचाही समावेश आहे.

तो स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा विराट कोहलीनंतरचा (711) दुसरा खेळाडू आहे. त्याचबरोबर त्याने यष्टीरक्षण करताना 20 विकेट्सही घेतल्या. त्यामुळे तो एकाच वर्ल्डकपमध्ये यष्टीमागे 20 विकेट आणि 500 हून अधिक धावा करणारा पहिलाच यष्टीरक्षकही ठरला.

डी कॉक वनडेतून निवृत्त

30 वर्षीय डी कॉकने 2 वर्षांपूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आता तो वनडेतूनही निवृत्त झाला आहे. असे असले तरी तो दक्षिण आफ्रिकेकडून टी20 खेळताना दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

डी कॉकने त्याच्या वनडे कारकिर्दीत 155 सामन्यांमध्ये 45.74 च्या सरासरीने 6770 धावा केल्या आहेत. तसेच यष्टीरक्षण करताना त्याने 226 विकेट्स घेतल्या आहेत, ज्यात 209 झेल घेतले आहेत, तर 17 यष्टीचीत केले आहेत.

डी कॉकने 8 वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्वही केले असून चार सामन्यात विजय मिळवला आहे, तर तीन सामन्यात पराभव स्विकारला आहे. तसेच 1 सामन्याचा निकालच लागलेला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT