PV Sindhu Dainik Gomantak
क्रीडा

All England Championship 2023: ऑल इंग्लंडमध्ये भारताला मोठा धक्का, पीव्ही सिंधू पहिल्याच फेरीत बाहेर

PV Sindhu: या स्पर्धेत बुधवारी भारताला मोठा धक्का बसला आहे. दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू या स्पर्धेत सहभागी होणारी भारताची सर्वात मोठी दावेदार होती.

Manish Jadhav

All England Championship 2023: बॅडमिंटनची सर्वात मोठी स्पर्धा सध्या इंग्लंडमध्ये खेळली जात आहे, ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप. या स्पर्धेत बुधवारी भारताला मोठा धक्का बसला आहे. दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू या स्पर्धेत सहभागी होणारी भारताची सर्वात मोठी दावेदार होती. पण ती आता यातून बाहेर पडली आहे.

पीव्ही सिंधू बाहेर पडली

ऑल इंग्लंड बॅडमिंटनमध्ये भारतीय स्टार पीव्ही सिंधूचा खराब फॉर्म कायम राहिला कारण तिला चीनच्या झांग यी मॅनकडून सरळ गेममध्ये पहिल्या फेरीतून बाहेर पडावे लागले. जागतिक क्रमवारीत 9व्या स्थानी असलेली आणि दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती सिंधूला 39 मिनिटे चाललेल्या महिला एकेरीच्या लढतीत 17-21, 11-21 असा पराभव पत्करावा लागला. या वर्षातील ही तिसरी वेळ आहे, जेव्हा सिंधू पहिल्या फेरीच्या पुढे जाऊ शकली नाही.

सिंधूचा खराब फॉर्म कायम आहे

जानेवारीत, मलेशिया ओपनमध्ये तिला स्पेनच्या कॅरोलिना मारिनकडून पराभव पत्करावा लागला होता आणि त्याच महिन्यात इंडियन ओपनमध्ये ती पहिल्या फेरीतून बाहेर पडली होती. सिंधूने अलीकडेच तिचे कोरियन प्रशिक्षक पार्क ताई-सांग यांच्यापासून फारकत घेतली, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली तिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते. संपूर्ण सामन्यात सिंधू पिछाडीवर पडली. जागतिक क्रमवारीत 17व्या क्रमांकावर असलेल्या झांग यीने तिच्यापेक्षा जास्त चपळता आणि आक्रमकता दाखवली.

यानंतर सिंधूला पुनरागमन करता आले नाही आणि दुसरा गेम आणि सामना गमावला. तत्पूर्वी, ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या भारतीय महिला दुहेरी जोडीने 46 मिनिटे चाललेल्या पहिल्या फेरीच्या लढतीत थायलंडच्या सातव्या मानांकित जोंगकोलफान कितिथारकुल आणि रविंदा प्रजोंगजाई यांचा 21-18, 21-14 असा पराभव केला. प्री-क्वार्टर फायनलमध्ये भारतीय जोडीचा मुकाबला जपानच्या युकी फुकुशिमा आणि सायाका हिरोटा या जोडीशी होईल. मंगळवारी लक्ष्य सेन आणि एचएस प्रणॉय यांनी आपापले सामने जिंकून पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: नो पार्किंगचा फलक काय कामाचा!

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT