Shah Rukh Khan Dainik Gomantak
क्रीडा

Punjab Kings च्या 'बादशाही स्टाईल' मध्ये शाहरुख खानची एन्ट्री, पाहा VIDEO

दैनिक गोमन्तक

पंजाब किंग्ज संघाने आयपीएल 2022 (IPL 2022) ची तयारी पूर्ण केली आहे. या संघाने मैदानाबाहेर आणि मैदानावरही चोख तयारी केली आहे. आता ही टीम सोशल मीडियावरही चर्चेत आहे. पंजाब किंग्सने भारतीय फलंदाज शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) एक जबरदस्त व्हिडिओ शेअर केला आहे. पंजाब किंग्जच्या (Punjab Kings) नजरा अजूनही पहिल्या आयपीएल विजेतेपदावर आहेत. स्पर्धेच्या इतिहासात पंजाबच्या संघाची कामगिरी सुमारचं ठरली आहे. परंतु, एकदा पंजाबचा संघही अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी ठरला आहे. (Punjab Kings have shared a video of Indian batsman Shah Rukh Khan)

दरम्यान, IPL 2022 च्या मेगा लिलावात या संघाने सर्वाधिक खेळाडू खरेदी केले आहेत. दुसरीकडे मात्र लिलावापूर्वी या संघाने फक्त दोन खेळाडूंना कायम ठेवले आहे. यावेळी लिलावात पंजाब संघाने शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि कागिसो रबाडा यांना आपल्या संघात घेतले आहे. केएल राहुलशिवाय मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) आता पंजाबचे कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे. यावेळी पंजाबच्या संघात असा एक खेळाडू आहे, ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे. त्या फलंदाजाचं नाव शाहरुख खान आहे. देशांतर्गत स्तरावरील उत्कृष्ट कामगिरीमुळे शाहरुखची बरीच चर्चा झाली आहे. त्याने तमिळनाडूकडून (Tamil Nadu) खेळताना सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या (Syed Mushtaq Ali Trophy) अंतिम फेरीत षटकार ठोकून आपल्या संघाला चॅम्पियन बनवले होते.

विशेष म्हणजे, तो त्याच्या नावामुळे खूप चर्चेत आहे. बॉलीवूड स्टार आणि केकेआरचा सहमालक शाहरुख खान याच्या नावामुळे तो अनेकदा चर्चेत असतो. पंबाजसाठी शेवटच्या षटकांमध्ये शानदार फलंदाजी करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. पंजाब किंग्सने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये बॉलिवूड स्टार शाहरुख खानच्या 'बादशाह' या गाण्याचा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. पंजाब किंग्सनेही हा व्हिडिओ त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. या व्हिडिओला 'बादशाह ओ बादशाह' असे कॅप्शन देण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये शाहरुख खान त्याच्या फलंदाजीच्या तयारीसह मैदानात उतरताना दिसत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT