Punjab Kings IPL
क्रीडा

IPL Auction 2024: 'सारख्याच नावामुळे गोंधळ अन्...', पंजाब किंग्सचे शशांक सिंगला खरेदी करण्यावर स्पष्टीकरण

Punjab Kings: आयपीएल लिलावात चूकीच्या खेळाडूला खेरेदी केलेले का, यावर पंजाब किंग्सने अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे.

Pranali Kodre

Punjab Kings Clarify on Shashank Singh buy in IPL 2024 Auction:

इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेसाठी मंगळवारी (19 डिसेंबर) दुबईत खेळाडूंचा लिलाव झाला. या लिलावात पंजाब किंग्सने खरेदी केलेल्या शशांक सिंग या खेळाडूमुळे बरीत चर्चा झाली. या लिलावात शशांक सिंग या नावामुळे पंजाब किंग्सचा मोठा गोंधळ झाल्याचे दिसले.

या लिलावात शशांक सिंग या नावाचे दोन खेळाडू होते. त्यामुळे पंजाब किंग्सने ज्या खेळाडूला घेतले, तो त्यांना घ्यायचा नव्हता. याबद्दल त्यांनी चर्चा करण्याचाही लिलावादरम्यान प्रयत्नही केला.

मात्र, लिलाव घेणाऱ्या मलिका सागर यांनी एकदा खेळाडू विकला गेल्यानंतर बदल होणार नसल्याचे सांगितले. या घटनेमुळे प्रचंड चर्चा झाली होती. यावर आता पंजाब किंग्सने अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे.

पंजाब किंग्सने सांगितले आहे की त्यांनी जो खेळाडू घेतला, तो नेहमीच त्यांच्या निशाण्यावर होता. त्यांनी पोस्ट करत लिहिले की 'दोन खेळाडूंची नावे सारखीच असल्याने गोंधळ झाला होता. आम्ही शशांकला संघात घेतल्याने आनंदी आहोत आणि तो आपमच्या संघाच्या यशात योगदान देईल अशा आशा आहे.'

दरम्यान, पंजाब किंग्सने खरेदी केलेला शशांक 32 वर्षांचा अष्टपैलू खेळाडू आहे. तो छत्तीसगढकडून खेळतो. तसेच यापूर्वी सनरायझर्स हैदराबाद संघात होता. तसेच दुसरा जो शशांक सिंग होता, तो 19 वर्षांचा असून या लिलावात अनसोल्ड राहिला.

पंजाब किंग्सच्या स्पष्टीकरणाच्या पोस्टवर 31 वर्षीय शशांकनेही उत्तर दिले आहे. त्याने लिहिले की 'सर्व ठिक आहे. माझ्यावर विश्वास ठेवण्याबद्दल धन्यवाद.'

नक्की झालं काय?

19 वर्षीय बंगालच्या शशांक सिंगचे नाव लिलावात साधारण रात्री 8 वाजताच्या सुमारास पुकारले गेले. त्यावेळी कोणीही बोली लावली नाही. त्यानंतर लगेचच 31 वर्षीय शशांकचे नाव पुकारण्यात आले, ज्यावर फक्त पंजाब किंग्सने 20 लाखांची बोली लावली.

पण त्यानंतर पंजाब किंग्सच्या टेबलवर काही चर्चा झाली आणि पंजाब किंग्सची सहसंघमालकिन प्रीती झिंटा आणि नेस वाडिया यांननकार देणारे काही हावभाव केले. त्यावेळी मल्लिका सागर यांनी विचारले की तुम्हाला खेळाडू नको आहे? त्यावर वाडिया यांनी नाही असे म्हटले. मात्र नंतर मल्लिका सागर यांनी हा निर्णय मागे घेता येणार नसल्याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

POP Ganesh Idols: बंदी असतानाही पीओपीचा वापर! फोंड्यातील गणेशमूर्ती कार्यशाळेवर छापा, मूर्ती जप्त

Rohit-Virat Retirement: विराट-रोहित एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार? BCCI उपाध्यक्षांचा मोठा खुलासा, म्हणाले, '...गरज नाही'

Mhaje Ghar Yojana: "म्हज्या गोंयकारांक चवथीचें गिफ्ट" मुख्यमंत्र्यांची घोषणा! माझे घर योजनेतून 450 कुटुंबांना मिळणार मालकी हक्क

Modi Express For Ganeshotsav: 'कोकणात' जाऊचो आनंद काय वेगळोच... गणेशोत्सवासाठी 'मोदी एक्सप्रेस' धावली, नितेश राणेंचा रेल्वेत फेरफटका Watch Video

12 कोटी कॅश, 6 कोटींचे दागिने, १ कोटी परकीय चलन आणि अलिशान कार; काँग्रेस आमदाराला अटक, गोव्यात केली होती छापेमारी

SCROLL FOR NEXT