RCB vs PBKS Cricket News Updates, IPL 2022 News Updates dainik gomantak
क्रीडा

IPL 2022 RCB vs PBKS : पंजाबचा आरसीबीवर 5 विकेट्सनं विजय

IPL 2022 RCB vs PBKS : डू प्लेसिसच्या 88 धावांची जबरदस्त खेळीनंतरही आरसीबीची हार

दैनिक गोमन्तक

IPL 2022 RCB vs PBKS : मुंबईच्या डी. वाय स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या तिसऱ्या सामन्यात पंजाबच्या संघानं आरसीबीला 5 विकेट्सनं परभूत केलं. या सामन्यात नाणेफेक जिंकून पंजाबच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतर मैदानात आलेल्या आरसीबीच्या फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करत पंजाबसमोर 206 धावांचं विशाल लक्ष्य ठेवलं. परंतु, या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पंजाबच्या फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिलाय. तर पंजाब किंग्जसाठी ओडियन स्मिथ आणि शाहरुख खान या जोडीने बंगळुरूच्या जबड्यातून सामना हिसकावून घेत 19 षटकांत 208 धावा करत हा सामना जिंकला. (Punjab Kings beat Royal Challengers Bangalore by five wickets in IPL 2022)

206 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबने 14.5 षटकात 156 धावांवर पाच विकेट गमावल्या होत्या. त्यावेळी पंजाबच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर चिंता जाणवत होती. तर आरसीबीविरुद्ध सामन्यात पंजाबच्या संघानं लिव्हिनस्टोनच्या रुपात त्यांची पाचवी विकेट्स गमावली आहे. विजयासाठी पंजाबला 30 बॉलमध्ये 50 धावांची आवश्यकता होती. त्यानंतर ओडियन स्मिथ आणि शाहरुख खान यांनी फलंदाजी करताना आश्चर्यकारक कामगिरी केली. ओडियन स्मिथने फक्त 8 चेंडू खेळून 25 धावा केल्या. त्याने 8 चेंडूत 1 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने २५ धावा केल्या. तो नाबाद राहिला. तर त्याचवेळी शाहरुख खान ही 20 चेंडूत 24 धावा करत नाबाद राहिला.(RCB vs PBKS Cricket News Updates)

दरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने एकाच षटकात दोनदा ओडियन स्मिथचा झेल सोडला. ज्याचा फटका संघाला सहन करावा लागला. त्यानंतर ओडियन स्मिथने धावांचा पाऊस पाडला. आयपीएलच्या (IPL) मेगा लिलावात ओडियन स्मिथसाठी चुरशीची लढत झाली होती. शेवटी पंजाब किंग्सने ऑडियन स्मिथला ६ कोटी रुपयांना विकत घेतले. जमैकाचा खेळाडू स्मिथने अलीकडच्या काळात मोठे फटके मारत आपले नाव उज्वल केले आहे.

प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 205 धावांची भक्कम धावसंख्या उभारली. संघाचा नवा कर्णधार फाफ डू प्लेसिसने 88 धावांची जबरदस्त खेळी खेळली. दिनेश कार्तिक 14 चेंडूत 33 धावा केल्या. तर विराट कोहलीनेही १८ चेंडूंमध्ये ३० धावांची खेळी केली. या आयपीएल हंगामातील हा पहिला 200+ धावा होत्या, परंतु त्यानंतरही आरसीबीचा (RCB)संघ पंजाबला विजयापासून रोखू नाही.

पंजाबच्या (Panjab) फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर संघाची सुरुवात जबरदस्त झाली. कर्णधार मयंक अग्रवाल 32, शिखर धवन 43, भानुका राजपक्षे यांनीही 43 धावा केल्या. शेवटी, शाहरुख खानने 20 चेंडूत 24 आणि ओडियन स्मिथने 8 चेंडूत 25 धावा केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Video: "हटो हटो, डोन्ट डिस्टर्ब चेट्टा"! कॅप्टन सूर्याचा धमाल व्हिडीओ; नेटवर घालतोय धुमाकूळ

Goa Police Attack: दगडफेक अन् शस्त्राने वार! मध्य प्रदेशात गोवा पोलिसांवर जीवघेणा हल्ला; सब-इन्स्पेक्टर अन् हवालदार जखमी

Kurdi: 1882 साली सोमेश्वराची घटना पोर्तुगीज दप्तरात नोंद आहे! साळावली धरणाच्या जलाशयाखाली बुडालेले 'कुर्डी' गाव

Bengaluru Airport Bomb Threat: "माझ्याकडे दोन बॉम्ब आहेत", बंगळुरु विमानतळावर हायव्होल्टेज ड्रामा; इंडिगो प्रवाशाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Chimbel Protest: चिंबलवासीयांचे महाआंदोलन! शेकडो ग्रामस्थ पोचले जुने गोवेत; अधिसूचना येईपर्यंत उपोषणाचा इशारा Video

SCROLL FOR NEXT