PSL Controversy Dainik Gomantak
क्रीडा

PSL Controversy: चेंडूशी छेडछाड करताना कॅमेऱ्यात कैद झाला 'हा' खेळाडू; आता थेट हकालपट्टीची टांगती तलवार Watch Video

Pakistan Ball Tampering Scandal: पाकिस्तान सुपर लीग 2026 चा हंगाम आधीच विविध कारणांमुळे वादात असताना आता या स्पर्धेला चेंडूशी छेडछाड केल्याच्या आरोपाचा मोठा काळा डाग लागला.

Manish Jadhav

Lahore Qalandars vs Karachi Kings Controversy: पाकिस्तान सुपर लीग 2026 चा हंगाम आधीच विविध कारणांमुळे वादात असताना आता या स्पर्धेला चेंडूशी छेडछाड केल्याच्या आरोपाचा मोठा काळा डाग लागला. लाहोर कलंदर्स संघाने कराची किंग्सविरुद्धच्या सामन्यात चेंडूची स्थिती बदलण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला असून, यामुळे पाकिस्तान क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली. विशेषतः पाकिस्तानचा स्टार फलंदाज फखर जमान याच्यावर याचे थेट आरोप ठेवण्यात आल्याने चाहते आणि माजी क्रिकेटपटू थक्क झाले आहेत. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अडचणीत मोठी वाढ झाली.

या संपूर्ण वादाला कराची किंग्स आणि लाहोर कलंदर्स यांच्यातील अटीतटीच्या सामन्यादरम्यान सुरुवात झाली. मैदानातील पंचांनी जेव्हा चेंडूची पाहणी केली, तेव्हा चेंडूच्या शिवणीजवळ जाणीवपूर्वक छेडछाड केल्याचे आणि चेंडूचे नुकसान झाल्याचे दिसून आले. या गंभीर प्रकारानंतर पंचांनी तात्काळ कारवाई करत लाहोर कलंदर्सला दोषी ठरवले आणि कराची किंग्सला '5 पेनल्टी रन्स' बहाल केल्या. सामन्याच्या शेवटच्या टप्प्यावर मिळालेल्या या 5 धावांमुळे खेळाचे चित्र पूर्णपणे पालटले आणि कराची किंग्सने 3 चेंडू राखून हा सामना आपल्या खिशात घातला.

सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये लाहोर कलंदर्सचा कर्णधार शाहीन शाह आफ्रिदी, वेगवान गोलंदाज हारीस राउफ आणि फखर जमान हे आपसात चर्चा करत असताना चेंडूशी काहीतरी अजब हालचाली करताना दिसत आहेत. फखर जमानने चेंडूशी छेडछाड केल्याचा आरोप नाकारला असला तरी पंचांच्या अहवालामुळे त्याच्यावर टांगती तलवार आहे. फखर हा पाकिस्तानच्या सर्वात शिस्तप्रिय आणि सन्मानित खेळाडूंपैकी एक मानला जातो, त्यामुळे त्याच्यावरील या आरोपांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

आता सर्वांच्या नजरा पीसीबीच्या शिस्तपालन समितीकडे लागल्या आहेत. या प्रकरणाचा पुढील 48 तासांत रिव्ह्यू केला जाणार असून जर चेंडूशी छेडछाड केल्याचे सिद्ध झाले, तर कर्णधार शाहीन शाह आफ्रिदीवरही कडक कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कर्णधाराच्या संमतीशिवाय अशी गोष्ट घडणे अशक्य असल्याचे मत क्रिकेट तज्ज्ञांनी व्यक्त केले. पीएसएलच्या या सीझनमध्ये लाहोर कलंदर्सवर लागलेला हा डाग केवळ एका संघासाठी नाही, तर संपूर्ण लीगच्या प्रतिमेसाठी घातक ठरण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाचा दणका! अधिक वेळ देण्याची याचिका फेटाळली; दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

SCROLL FOR NEXT