Pro Kabaddi ProKabaddi
क्रीडा

Pro Kabaddi Auction: पवनला विक्रमी बोली, तर मनिंदर-फझलही कोट्यधीश; लिलावानंतर असे आहेत सर्व 12 संघ

Pro Kabaddi All Teams: प्रो कबड्डीच्या 10 व्या हंगामाच्या लिलावानंतर सर्व 12 संघांबद्दल जाणून घ्या.

Pranali Kodre

Pro Kabaddi Season Ten All Teams:

प्रो कबड्डी भारतातील लोकप्रिय स्पर्धांपैकी एक असून या स्पर्धेच्या 10 व्या हंगामाचा लिलाव 9 आणि 10 ऑक्टोबर दरम्यान पार पडला. या 10 व्या हंगामाचा लिलाव विक्रमी ठरला. काही खेळाडूंना कोटींमध्ये बोली लागली.

तेलुगू टायटन्सने या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली लावत पवन सेहरावत या खेळाडूला आपल्या संघात घेतले. त्यांनी त्याच्यासाठी 2.60 कोटींची बोली लावली. त्याचबरोबर मोहम्मदरझा शादलूई आणि मनिंदर सिंग या दोन खेळाडूंनाही २ कोटींहून अधिक किंमत मिळाली. शादलूला पुणेरी पलटणने 2.31 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले. तसेच मनिंदर सिंग 2.12 कोटींची बोली लागल्यावर बंगाल वॉरियर्सने त्याच्यासाछी एफबीएम कार्ड वापरले.

याशिवाय फझल अत्राचली आणि सिद्धार्थ देसाई यांच्यासाठीही कोटींमध्ये बोली लागली. फझल 1.60 कोटींमध्ये गुजरात जायंट्स संघात गेला, हरियाणा स्टिलर्सने सिद्धार्थ देसाईसाठी 1 कोटी रुपयांची बोली लावली. दरम्यान या लिलावानंतर सर्व 12 संघांवर नजर टाकू

बंगाल वॉरियर्स

  • संघात कायम केलेले खेळाडू - वैभव भाऊसाहेब गर्जे, आर गुहान, सुयॉन बबन गायकर, प्रशांत कुमार

  • लिलावात खरेदी केलेले खेळाडू - मनिंदर सिंग, नितीन रावल, शुभम शिंदे, श्रीकांत जाधव, चाय-मिंग चांग, ​​अस्लम थंबी, अक्षय भरत भोईर, अक्षय कुमार, अक्षय बोडके, नितीन कुमार, विश्वास एस.

तेलुगू टायटन्स -

  • संघात कायम केलेले खेळाडू - परवेश भैंसवाल, रजनीश, मोहित, नितीन, विजय

  • लिलावात खरेदी केलेले खेळाडू - पवन सेहरावत, हमीद मिर्झाई नादर, मिलाद जब्बारी, शंकर भीमराज गदई, ओंकार आर. मोरे, गौरव दहिया, मोहित, अजित पांडुरंग पवार, रॉबिन चौधरी.

हरियाणा स्टिलर्स -

  • संघात कायम केलेले खेळाडू - के प्रपंजन, विनय, जयदीप, मोहित, नवीन, मोनू, हर्ष, सनी

  • लिलावात खरेदी केलेले खेळाडू - सिद्धार्थ देसाई, चंद्रन रणजीत, हसन बलबूल, घनश्याम मगर, राहुल सेठपाल, हिमांशू चौधरी, रवींद्र चौहान, आशिष, मोहित.

युपी योद्धा -

  • संघात कायम केलेले खेळाडू - परदीप नरवाल, नितेश कुमार, सुमित, आशु सिंग, सुरेंदर गिल, अनिल कुमार, महिपाल

  • लिलावात खरेदी केलेले खेळाडू - विजय मलिक, सॅम्युअल वफाला, हेल्विक वांजला, हरेंद्र कुमार, गुलवीर सिंग, गुरदीप, किरण लक्ष्मण मगर, नितीन पनवार

पुणेरी पलटण -

  • संघात कायम केलेले खेळाडू - अभिनेश नदराजन, गौरव खत्री, संकेत सावंत, पंकज मोहिते, अस्लम इनामदार, मोहित गोयत, आकाश शिंदे, बादल सिंग, आदित्य शिंदे

  • लिलावात खरेदी केलेले खेळाडू - मोहम्मदरझा शादलूई, वाहिद रेझाईमेहर, अहमद मुस्तफा इनामदार, ईश्वर, हरदीप.

यु मुम्बा -

  • संघात कायम केलेले खेळाडू - सुरिंदर सिंग, जय भगवान, रिंकू, हैदरअली एकरामी, शिवम, शिवांश ठाकूर, प्रणय विनय राणे, रुपेश, सचिन

  • लिलावात खरेदी केलेले खेळाडू - गिरीश मारुती एरनाक, महेंद्र सिंग, गुमान सिंग, अमीर मोहम्मद जफरदानेश, अलिरेझा मिर्झायन, रोहित यादव, कुणाल, विश्वनाथ व्ही, सौरव पार्थे.

जयपूर पिंक पँथर्स -

  • संघात कायम केलेले खेळाडू - सुनील कुमार, अर्जुन देशवाल, अजित कुमार व्ही, रजा मिरभागेरी, भवानी राजपूत, साहुल कुमार, अंकुश, अभिषेक केएस, आशिष, देवांक

  • लिलावात खरेदी केलेले खेळाडू - अमीर हुसेन मोहम्मदमलेकी, शशांक बी, लकी शर्मा, लविश, नवनीत, राहुल चौधरी, सुमित.

पटना पायरेट्स -

  • संघात कायम केलेले खेळाडू - सचिन, नीरज कुमार, मनीष, थियागराजन युवराज, नवीन शर्मा, रणजित व्यंकटरमण नाईक, अनुज कुमार

  • लिलावात खरेदी केलेले खेळाडू - मनजीत, झेंग-वेई चेन, डॅनियल ओधियाम्बो, रोहित, साजिन चंद्रशेखर, कृष्णन, अंकित, दीपक कुमार, महेंद्र चौधरी, संदीप कुमार, राकेश नरवाल, संजय

दबंग दिल्ली

  • संघात कायम केलेले खेळाडू - नवीन कुमार, विजय, मनजीत, आशिष नरवाल, सूरज पनवार

  • लिलावात खरेदी केलेले खेळाडू - विशाल भारद्वाज, सुनील, आशु मलिक, मीतू, नितीन चंडेल, बाळासाहेब शहाजी जाधव, आकाश प्रशेर, विक्रांत, फेलिक्स ली, युवराज पांडे, मोहित.

तमिळ थलायवाज -

  • संघात कायम केलेले खेळाडू - अजिंक्य पवार, सागर, हिमांशू, एम अभिषेक, साहिल, मोहित, आशिष, नरेंद्र, हिमांशू, जतिन

  • लिलावात खरेदी केलेले खेळाडू - हिमांशू सिंग, सेल्वामणी के, हृतिक, मसनमुतु लक्षनन, सतीश कानन, अमिरहोसेन बस्तामी, मोहम्मदरेझा काबौद्रहंगी.

गुजरात जायंट्स -

  • संघात कायम केलेले खेळाडू - मनुज, सोनू, राकेश, रोहन सिंग, प्रतिक दहिया

  • लिलावात खरेदी केलेले खेळाडू - फझल अत्राचली, रोहित गुलिया, मोहम्मद इस्माईल नबीबख्श, अरकम शेख, सोम्बीर, विकास जगलान, सौरव गुलिया, दीपक राजेंद्र सिंग, रवी कुमार, जीबी मोरे, जितेंद्र यादव, नितेश, जगदीप, बालाजी डी.

बंगळुरू बुल्स -

  • संघात कायम केलेल खेळाडू - नीरज नरवाल, भरत, सौरभ नंदल, यश हुडा

  • लिलावात खरेदी केलेले खेळाडू - विशाल, विकास खंडोला, रण सिंग, मोहम्मद लिटन अली, पिओटर पामुलक, पोनपार्थिबन सुब्रमण्यन, सुंदर, सुरजीत सिंग, अभिषेक सिंग, बंटी, मोनू, अंकित, सुशील, रक्षित, रोहित कुमार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT