Pro Kabaddi 10 | Eliminators Matches
Pro Kabaddi 10 | Eliminators Matches X/ProKabaddi
क्रीडा

Pro Kabaddi 10: पटना पायरेट्स अन् हरियाणा स्टिलर्स 'अंतिम चार' संघात दाखल, आता रंगणार सेमीफायनलचा थरार

Pranali Kodre

Pro Kabaddi 10, Semi-Final Matches Schedule:

प्रो कबड्डीचा सध्या 10 वा हंगाम खेळवला जात आहे. हा हंगाम आता अखेरच्या टप्प्यात आहे. या हंगामातील साखळी फेरीतील 132 सामने पूर्ण झाले असून सोमवारी (26 फेब्रुवारी) एलिमिनेटरचे दोन्ही सामनेही खेळवण्यात आले.

एलिमिनेटमध्ये पटना पायरेट्स आणि हरियाणा स्टिलर्स या संघांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे या हंगामातील अंतिम 4 संघ निश्चित झाले आहेत. पुणेरी पलटण आणि जयपूर पिंक पँथर्स यांनी यापूर्वीच उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले होते.

  • पटना पायरेट्सचा विजय

सोमवारी पहिला एलिमिनेटर सामना गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या दबंग दिल्ली आणि सहाव्या क्रमांकावरील पटना पायरेट्स संघात खेळवण्यात आला होता. शेवटपर्यंत रोमांचक झालेल्या या सामन्यात पटना पायरेट्सने दिल्लीला 37-35 अशा फरकाने पराभूत केले.

दिल्लीकडून कर्णधार अशू मलिकने एकट्याने 19 पाँइंट्स घेतले. मात्र कोणाला फार काही करता आले नाही, तर पटनाकडून रेडर सचिनने 9 पाँइंट्स मिळवले, तर मनजीत आणि सुधाकर एम यांनी प्रत्येकी 5 पाँइंट्स मिळवले.

  • हरियाणा स्टिलर्सचा एकतर्फी विजय

दरम्यान, या सामन्यानंतर गुणतालिकेत चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर राहिलेल्या गुजरात जायंट्स आणि हरियाणा स्टीलर्स यांच्यात दुसरा एलिमिनेटर सामना झाला. या सामन्यात हरियाणा स्टिलर्सने एकतर्फी 42-25 असा विजय मिळवला.

गुजरातकडून प्रतिक दहिया आणि राकेश यांनाच प्रत्येकी 5 पाँइंट्स घेता आले. त्याच्याशिवाय कोणीही अधिक पाँइंट्स घेऊ शकले नाहीत. कर्णधार फझल अत्राचली देखील या सामन्यात फार कमाल करू शकला नाही. हरियाणाकडून रेडर विनयने सर्वाधिक 12 पाँइंट्स कमावले, तर शिवम पतारेने 8 पाँइंट्स घेतले. तसेच डिफेंडर मोहित नंदालनेही 7 पाँइट्स मिळवले.

अशी रंगणार उपांत्य फेरी (Semi-Final)

पटना पायरेट्स आणि हरियाणा स्टिलर्स यांनी एलिमिनेटरचे सामने जिंकल्याने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. दरम्यान साखळी फेरीनंतर गुणतालिकेत पहिल्या दोन क्रमांकांवर राहिलेल्या पुणेरी पलटण आणि जयपूर पिंक पँथर्स यांनी यापूर्वीच उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले होते. त्यामुळे आता हे चार संघ विजेतेपदापासून अवघ्या दोन पाऊल दूर आहेत.

उपांत्य फेरी हैदराबादमध्ये 28 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे. उपांत्य फेरीतील पहिला सामना पुणेरी पलटण विरुद्ध पटना पायरेट्स यांच्यात रात्री 8.00 वाजता होईल.

त्यानंतर लगेचच दुसरा उपांत्य सामना जयपूर पिंक पँथर्स आणि हरियाणा स्टिलर्स यांच्यात रात्री 9.00 वाजता सुरू होणार आहे. या दोन्ही सामन्यातील विजेते संघ 1 मार्च रोजी हैदराबादमध्ये अंतिम सामना खेळतील.

कुठे पाहाणार सामने?

प्रो कबड्डीच्या 10 व्या हंगामातील सामन्यांचे थेट प्रक्षेपण टीव्हीवर स्टार स्पोर्ट्सच्या चॅनेलवर होत आहे, तर ऑनलाईन प्रक्षेपण डीज्नी प्लस हॉटस्टार ऍप आणि वेबसाईटवर होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: ST आरक्षणासाठी युरी आलेमाव अधिवेशनात आवाज उठवणार; 'अस्मिताय दिसा'सह 4 खाजगी ठराव

Goa News: कोलवा PSI ने मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या महिलेवर खंडणीचा गुन्हा, पतीसह झाली होती अटक

Goa Todays Live Update: कर्नाटकाने म्हादईचे पाणी वळवण्यासाठी केलेल्या कामांची पाहणी होणार: CM सावंत

Futsal Goa: गोव्याच्या आंबेली स्पोर्टस क्लबचा गतविजेत्यांना मिनर्व्हा अकादमीला धक्का, उपांत्य फेरीत प्रवेश

Goa 2075 देशातील पहिली लाईव्ह कादंबरी; अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या पाच व्यक्तींची कथा

SCROLL FOR NEXT