आयपीएल 2022 (IPL 2022) च्या 15 व्या मोसमाला सुरुवात झाली आहे. हंगामाच्या पहिल्याच सामन्यात उपविजेत्या केकेआरने चेन्नई सुपर किंग्ज पराभव केला. याच पाश्वसभूमीवर डावखुरा फलंदाज असणाऱ्या प्रथम सिंगने (Pratham Singh) अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर भारतातील सर्वोच्च बिझनेस स्कूल 'ISB' मध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला. परंतु क्रिकेटची आवड त्याला इंजिनिअरिंगकडून इंडियन प्रीमियर लीगकडे घेऊन आली. दिल्लीच्या 29 वर्षीय सिंगने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये (Syed Mushtaq Ali Trophy) रेल्वेसाठी शानदार कामगिरी करणे सुरुच ठेवले. आणि आता आयपीएल फ्रँचायझी गुजरात लायन्सने त्याला संघात घेतले आहे. परंतु तो मैदानात उतरु शकला नाही. आता पाच वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर, कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) त्याला शेवटच्या मेगा लिलावात निवडले. आता तो आयपीएल 2022 मध्ये आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी सज्ज झाला आहे. (pratham Singh has been picked by Kolkata Knight Riders)
दरम्यान, प्रथम सिंगने इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये इंजिनीअरिंग पूर्ण केले. त्यानंतर त्याला आयएसबी हैदराबादमध्ये प्रवेश मिळाला. परंतु क्रिकेटची आवड त्याला मैदानाकडे आकर्षित करत होती. प्रथमने सांगितले, ''पहिल्या लॉकडाऊनच्या वेळी, जेव्हा सर्व काही बंद होते आणि करण्यासारखे काहीच नव्हते तेव्हा मी क्रिकेटची प्रक्टीस करण्यास सुरुवात केली. त्यावेळी मनात अनेक गोष्टी रुंजी घालत होत्या. मी 27 वर्षांचा होतो. मी आयपीएलच्या संघातही नव्हतो. त्यामुळे ती चांगलीच गोष्ट होती. मी अभ्यास करण्याचा विचार केला आणि ISB हैदराबादची परीक्षा पास केली. परंतु त्यानंतर क्रिकेट पुन्हा सुरु केले. मला जास्तीत जास्त क्रिकेट खेळायचे असून ते माझे पॅशन आहे.'' (Pratham Singh News)
मॅक्युलम-नायरकडून पहिल्यांदा शिकलो
आयपीएलमध्ये खेळण्याबाबत सिंग म्हणाला, "कोणत्याही देशांतर्गत क्रिकेटपटूसाठी ही एक मोठी संधी आहे. आणि मी रेल्वेसाठी चांगली कामगिरी करत आहे. आयपीएलमधील एक डावही तुमचे आयुष्य बदलू शकते. जर तुम्ही चांगली कामगिरी केली तर तुम्हाला देशासाठी खेळण्याची संधीही मिळू शकते. मी गेल्या दोन आठवड्यांपासून केकेआर संघासोबत आहे. ब्रेंडन मॅक्क्युलम आणि अभिषेक नायर सरांकडून क्रिकेटचे धडे गिरवत आहे. मी क्रिकेटपटू म्हणून अधिक सुधारणा करुन प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करत आहे.''
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी रेल्वेसाठी
प्रथम सिंगने 2019-20 सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये 10 सामन्यांमध्ये 438 धावा केल्या. यादरम्यान त्याची सरासरी 54.75 होती तर स्ट्राइक रेट 136.02 होता. यामुळे रेल्वे संघ साखळी फेरीत अव्वल ठरला होता. त्यानंतर 2020-21 हंगामात त्याने एक शतक आणि दोन अर्धशतकांच्या मदतीने 229 धावा केल्या. यादरम्यान त्याची सरासरी 74.75 इतकी होती.
प्रथम सिंगने 2019 च्या मोसमात रेल्वेकडून सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळताना सलग चार अर्धशतके झळकावली होती. त्याने पीटीआयशी बोलताना सांगितले की, 'मी माझ्या पदार्पणाच्या मोसमात सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू होतो. आम्ही मुंबई सारख्या बलाढ्य संघाला पराभूत केले होते. गेल्या तीन वर्षांपासून मी पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये रेल्वेसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. म्हणूनच दरवर्षी मी आयपीएलच्या कॉलची वाट पाहत होतो. परंतु माझी निवड होत नसल्याने गेली पाच वर्षे संघर्ष करत होतो. पण खूप उशीर झाला आहे.
प्रथम सिंग कोरोनामुळे यंदाच्या रणजी ट्रॉफीच्या पहिल्या दोन सामन्यात खेळू शकला नाही. परंतु जेव्हा तो खेळला तेव्हा त्याने रेल्वेसाठी पहिल्या डावात 75 धावा केल्या आणि जम्मू-काश्मीरवर नऊ गडी राखून विजय मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.