England Dainik Gomantak
क्रीडा

ब्रिस्बेनमध्ये बत्ती गुल, अ‍ॅशेसच्या Live कव्हरेजला ब्रेक!

ब्रिस्बेनमधील (Brisbane) गाबा स्टेडियममधील वीज खंडित झाल्यामुळे अ‍ॅशेसच्या (Ashes) पहिल्या कसोटीच्या जागतिक प्रसारणावर परिणाम झाला आहे.

दैनिक गोमन्तक

ब्रिस्बेनमधील (Brisbane) गाबा स्टेडियममधील वीज खंडित झाल्यामुळे अ‍ॅशेसच्या (Ashes) पहिल्या कसोटीच्या जागतिक प्रसारणावर परिणाम झाला आहे. कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या पहाटे ही घटना घडली, त्यानंतर सामन्याचे थेट प्रक्षेपण जगभर ठप्प झाले. वीज खंडीत झाल्यानंतर सामन्यातील डीआरएसचा वापरही बंद झाला. ऑस्ट्रेलियाने (Australia) स्वतःया सर्व गोष्टींची माहिती दिली. आम्ही लवकरात लवकर यातून सावरण्याचा प्रयत्न करत असल्याचे यावेळी सांगितले.

दरम्यान, वीज खंडीत होईपर्यंत मैदानावर सामना सुरु राहिला. विजेचा बिघाड आणि तांत्रिक बिघाडांमुळे सामन्याचे जागतिक कव्हरेज अर्धा तास विस्कळीत झाले. ऑस्ट्रेलियन क्रिकेट प्रवक्त्याने सांगितले की, वीज खंडीत झाल्यानंतर डीआरएस तंत्रज्ञानाने देखील काम करणे थांबवले. सामना पूर्णपणे थांबवणे हे मैदानावरील पंचांच्या निर्णयावर होता. स्टेडियममधील मोठा स्क्रीनही बंद करण्यात आला होता.

शिवाय, अ‍ॅशेसच्या पहिल्या कसोटीदरम्यान तांत्रिक त्रुटी समोर येत राहिल्या. गुरुवारी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ब्रॉडकास्टरला सांगितले की, ज्या उपकरणाद्वारे थर्ड अंपायर समोरचा फ्रंटफुट नो-बॉल तपासतात तेच उपकरण तुटले आहे.

इंग्लंडचा दुसरा डाव 297 धावांवर आटोपला

पॉवर फेल झाल्याच्या वृत्तादरम्यान, ऑस्ट्रेलियाने गॅबा कसोटीत इंग्लंडचा (England) दुसरा डाव 297 धावांत गुंडाळला. दरम्यान त्यांची एकूण आघाडी 19 धावांची होती. अशाप्रकारे इंग्लंडने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 20 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात जो रुटने 89 आणि डेव्हिड मलानने 82 धावा केल्या. तत्पूर्वी, इंग्लंडने पहिल्या डावात 147 धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 425 धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात इंग्लंडची सुरुवात दमदार झाली असली तरी रुट आणि मलान यांच्या शतकी भागीदारीमुळे संघाला चांगली आघाडी मिळेल असे वाटत होते. पण, चौथ्या दिवशी नॅथन लियॉनच्या प्रभावी गोलंदाजीने त्याच्या मोठ्या आघाडीच्या आशा धुळीस मिळवल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ZP Election: 'हे राजकारण मान्य नाही!' कुर्टी-फोंडा जागेवरून केतन भाटीकर आक्रमक; भाजपला थेट इशारा

Goa Forward: 'पोलिस आले, त्‍यांनी व्यासपीठावर जाऊन माईक बंद केला'! गावडोंगरीत अधिकाऱ्यांनी हलगर्जी केल्‍याचा गोवा फॉरवर्डचा दावा

Sangolda Casino: कॅसिनो कर्मचाऱ्यांचा दारूच्या नशेत धिंगाणा! सोशल मीडियावर होताहेत आरोप; सांगोल्डा येथील Viral Video मुळे चर्चा

Goa Live News: 'ओंकार' हत्तीसाठी न्याय नाही; महाराष्ट्रातील नागरिकांकडून गोवा सरकारला कळकळीचे आवाहन

अल्पवयीन रशियन मुलींकडून फुलांची विक्री, पर्यटकांसोबत फोटोसाठी आग्रह; हरमल किनाऱ्यावरील Video Viral

SCROLL FOR NEXT