GCA
GCA 
क्रीडा

पर्वरीतील इनडोअर क्रिकेट रखडले

Dainik Gomantak

पणजी

पर्वरीतील गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (जीसीए) इनडोअर क्रिकेट अकादमी संकुलातील क्रिकेटपटूंचा सराव सध्या ठप्प झाला आहे. त्यास कोविड-१९ कारणीभूत नसून प्रकल्पातील खेळपट्टीचे खराब टर्फ कारणीभूत आहे.

इनडोअर अकादमीतील कृत्रिम टर्फ खेळण्यास धोकादायक असल्यामुळे राज्यातील क्रिकेटपटूंच्या पावसाळातील सरावाची हक्काची सोय रोखली गेली आहे. त्याबाबत जीसीएलाही चिंता आहेपण आवश्यक टर्फच्या अनुपलब्धतेमुळे त्यांचीही गोची झाली आहे. जीसीएच्या क्रिकेट अकादमी संकुलाचे २२ ऑगस्ट २००९ रोजी बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष शशांक मनोहर यांच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात आले होतेत्यावेळी दयानंद नार्वेकर जीसीएचे अध्यक्ष होते.

जीसीएचे सचिव विपुल फडके यांनी दिलेल्या माहितीनुसारसुमारे बारा मोसम वापर झाल्याने कृत्रिम टर्फ खराब झाले आहे. या इनडोअर क्रिकेट संकुलातील खेळपट्ट्यांसाठी खास कृत्रिम टर्फ परदेशातून आयात करण्यात आले होते. देशात ते अनुपलब्ध असल्याने संबंधित व्यवहार करता आलेला नाही. या टर्फचा स्थानिक विक्रेताही सध्या देशात नाही. या आयात कृत्रिम टर्फऐवजी देशात उपलब्ध असलेले ॲस्ट्रो टर्फ खेळपट्टीसाठी वापरणे शक्य आहे का याबाबत जीसीएची चाचपणी सुरू आहे. त्यासंदर्भात निविदाही मागविण्यात आल्यापण लॉकडाऊनमुळे प्रक्रिया रखडली.

पर्वरी येथे इनडोअर क्रिकेट अकादमी संकुल उभे झाल्यानंतरपावसाळ्यात राज्यातील युवापुरुष व महिला क्रिकेटपटू या ठिकाणी सराव करत असत. मोसमपूर्व तयारीसाठी त्यांना हे संकुल खूपच उपयुक्त ठरते. कोरोना विषाणू महामारीमुळे जीसीएला यंदा बाहेरगावी मोसमपूर्व शिबिर घेणे शक्य होणार नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळे बीसीसीआयचा देशांर्तगत क्रिकेट मोसम सुरू झाल्यानंतरकदाचित सरावाविना थेट मैदानावर उतरण्याची पाळी राज्यातील क्रिकेटपटूवर येऊ शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: खलपांनी 3.50 लाख गोमन्तकीयांना लुटले, विरियातोंची उमेदवार म्हणून लायकी नाही; सांकवाळमध्ये सावंत, तानावडे बरसले

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आईसाठी 7 वर्षांची मुलगी ठरली 'देवदूत'; सतर्कता दाखवत वाचवला जीव

PM Modi Goa Rally: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोमंतकीयासाठी कोणत्या सहा गॅरंटी दिल्या? वाचा

PM Modi Goa Rally: गोव्यातून PM मोदींनी डागली तोफ; ''काँग्रेसनं देशात तुष्टीकरणांचं राजकारणं केलं...''

Goa Today's News Update: मोदींची सभा, काँग्रेसचे प्रश्न; गोव्यात राजकीय धुळवड, दिवभरातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT