FC Goa Dainik Gomantak
क्रीडा

सकारात्मकता हेच एफसी गोवाचे ध्येय, मुंबई सिटीच्या वाटचालीत अडथळा

पुढील लीगसाठी तयारीच्या दृष्टीने सकारात्मक टप्प्यावर मोसम संपविणे महत्त्वाचे ठरेल

दैनिक गोमन्तक

पणजी : एफसी गोवा संघाची आठव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील कामगिरी अतिशय खराब झाली, तरीही अजूनही ते सकारात्मक दृष्टिकोन बाळगून आहेत. त्यानुसार खेळल्यास गतविजेत्या मुंबई सिटीच्या वाटचालीत ते अडथळा आणू शकतात.

एफसी गोवासाठी केवळ औपचारिकता, तर मुंबई (Mumbai) सिटीसाठी महत्त्वाचा असलेला सामना शनिवारी (ता. 26) बांबोळी येथील ॲथलेटिक स्टेडियमवर खेळला जाईल. 18 सामन्यांतून फक्त 18 गुणांची कमाई केलेला एफसी गोवा संघ सध्या नवव्या क्रमांकावर आहे. मुंबई सिटीचा उपांत्य फेरीसाठी दावा आहे. 17 लढतीनंतर त्यांचे 28 गुण असून ते चौथ्या स्थानी आहेत.

यंदा स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात, तसेच मागील पाच सामन्यांत मुंबई सिटीला नमविणे एफसी गोवासाठी (goa) शक्य झालेले नाही. सध्याचा त्यांचा फॉर्म पाहता, शनिवारी मुंबई सिटीचेच पारडे जड असेल. निलंबनामुळे हुकमी स्पॅनिश मध्यरक्षक एदू बेदिया खेळू शकणार नाही. त्याच्या अनुपस्थितीचा फटका एफसी गोवास बसू शकतो.

‘‘पुढील लीगसाठी तयारीच्या दृष्टीने सकारात्मक टप्प्यावर मोसम संपविणे महत्त्वाचे ठरेल,’’ असे एफसी गोवाचे सहाय्यक प्रशिक्षक क्लिफर्ड मिरांडा यांनी शुक्रवारी सांगितले. ‘‘प्ले-ऑफ शर्यतीतून बाद झालेले असताना आणि समोर कोणतेच लक्ष्य नसताना खेळणे अवघड असते, पण क्लब आणि खेळाडूंसाठी पुढे जाण्याचे ध्येय असून प्रेरित राहणे महत्त्वाचे आहे,’’ असे मिरांडा म्हणाले.

‘‘आमचे आणखी तीन सामने शिल्लक आहेत, परंतु एकावेळी एकाच सामन्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आमचे ध्येय आहे. या संपूर्ण मोसमात खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मागील काही आठवड्यांतील खेळ अधिक चांगला झालेला आहे आणि त्यात सातत्य राखण्याची काळजी प्रत्येकाला घ्यायची आहे. ठरवल्याप्रमाणे हंगामाचा शेवट आम्हाला करायचा आहे,’’ असे मुंबई सिटीचे प्रशिक्षक डेस बकिंगहॅम यांनी सांगितले.

मैदानात उतरण्यापूर्वी...

- पहिल्या टप्प्यात 22 नोव्हेंबर 2021 रोजी फातोर्डा येथे मुंबई सिटीचा एफसी गोवावर 3-0 असा विजय

- आयएसएलमधील (ISL) मागील 5 लढतीत एफसी गोवाविरुद्ध मुंबई सिटीचे 2 विजय, 3 लढती बरोबरीत

- एफसी गोवाचा मुंबई सिटीविरुद्ध शेवटचा विजय 2019-20 मोसमात, तेव्हा 5-2 फरकाने बाजी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT