Chennai Video:  
क्रीडा

Chennai Video: संतापजनक! चेन्नई स्टेडियमवर पोलीस अधिकाऱ्याने कचरापेटीत फेकला तिरंगा, चाहत्यांनी आक्षेप घेताच...

चाहत्यांनी आक्षेप घेतल्यानंतर अधिकाऱ्याने ध्वज परत घेतले आणि पोलिसांच्या वाहनात ठेऊन दिले.

Pramod Yadav

PAK vs AFG Video: आयसीसी विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात सोमवारी चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये सामना रंंगला. या समान्यादरम्यान, एका पोलीस अधिकाऱ्याने चाहत्यांना स्टेडियममध्ये भारतीय ध्वज घेऊन जाण्यास मनाई केल्याने वाद निर्माण झाला.

धक्कादायक बाब म्हणजे अधिकाऱ्याने काही चाहत्यांकडून भारतीय ध्वज जप्त केला आणि कचरापेटीत फेकून दिल्याचा आरोप केला जात आहे. चाहत्यांनी आक्षेप घेतल्यानंतर अधिकाऱ्याने ध्वज परत घेतले आणि पोलिसांच्या वाहनात ठेऊन दिले.

पोलीस अधिकाऱ्याने चाहत्यांनाकडून ध्वज हिसकावून घेतला आणि त्यानंंतर चक्क कचरापेटीत टाकण्यास निघाला, यावेळी काही लोकांंनी पोलीस अधिकाऱ्याला झटकल्यानंतर त्याने ध्वज बाहेर काढून शेजारी उभ्या असलेल्या पोलीस वाहनांत ठेवले. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. पॉलिमर न्यूजच्या वतीने हा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे.

पोलीस अधिकारी असा का वागला? याबाबत अद्याप काही माहिती समोर आलेली नाही. मात्र, चेन्नईतील क्रिकेट सामन्यांदरम्यान पोलीस आणि सुरक्षा कर्मचारी चाहत्यांना प्लास्टिकचे ध्वज घेऊन जाण्यास परवानगी देत नाहीत, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

दरम्यान, ही घटना समोर आल्यानंतर भाजप आणि त्यांच्या समर्थकांनी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X वर एक मोहीम सुरू केली, ज्यात #DMK_HatesIndianFlag हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष के अन्नामलाई यांनी आमच्या राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याबद्दल पोलिसांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली तसेच, सत्ताधारी द्रमुकने लोकांची माफी मागावी अशी मागणी त्यांनी केलीय.

पाकिस्तानचा भारताकडून पराभव झाल्यानंतर राज्याचे युवा मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी जय श्री रामचा जयघोष करणाऱ्या चाहत्यांना नुकतीच नकार दिल्याचा संदर्भ देत त्यांनी चेन्नई स्टेडियममध्ये भारतीय ध्वज लावण्यास परवानगी का दिली नाही असा सवाल केला.

यासाठी त्यांंनी उच्च शिक्षण मंत्री के पोनमुडी यांचा मुलगा अशोक सिगामनी यांच्या अध्यक्षतेखालील तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनला जबाबदार धरले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Night Vigil App: तंत्रज्ञानामुळे रात्रीची सुरक्षा होणार अधिक सक्षम, विद्यार्थ्यांनी बनवलेले 'नाईट व्हिजिल' ॲप पोलिसांसाठी नवे हत्‍यार

Jasprit Bumrah Record: 'शतक' नाही, 'त्रिशतक'! जसप्रीत बुमराह बनणार क्रिकेटचा 'ऑल-फॉरमॅट किंग', फक्त 2 विकेट्सची गरज

Ravindra Bhavan Margao: मडगाव रवींद्र भवनातील 'पाय तियात्रिस्‍त' सभागृह पुन्हा खुले, दुरुस्‍तीवर सव्वादोन कोटी खर्च; मुख्यमंत्र्यांनी केले लोकार्पण

Dark Fog In Goa: पहाट ओढून घेतेय दाट धुक्‍याची चादर, सूर्यही उगवतोय विलंबानेच; काजू, आंब्यांच्या झाडांचा मोहोर करपून जाण्याचा धोका

Konkani Drama Competition: साखळीत आजपासून 'कोकणी नाट्य' स्पर्धा, मुख्यमंत्र्यांच्‍या हस्‍ते उद्‌घाटन; सत्तरी, डिचोलीतील 18 मंडळांचा सहभाग

SCROLL FOR NEXT