FIFA World Cup 2022 | Poland Team 
क्रीडा

FIFA World Cup 2022: युद्ध रशिया-युक्रेनचे; ताप पोलंडच्या फुटबॉल टीमला

काही दिवसांपुर्वीच पोलंड-युक्रेन सीमेवर क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे निर्माण झाला होता तणाव

Akshay Nirmale

FIFA World Cup 2022: फुटबॉलच्या वर्ल्डकप स्पर्धेला 20 नोव्हेंबरपासून कतारमध्ये सुरवात होत आहे. वेगवेगळे संघ कतारमध्ये दाखल होत आहेत. पण या सर्वात सध्या सर्वात लक्षवेधी ठरला आहे तो पोलंडचा संघ. कारअण पोलंडच्या संघाला चक्क F16 लढाऊ विमानांच्या घेऱ्यामध्ये कतारमध्ये दाखल व्हावे लागले आहे. (Russia-Ukraine War)

रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम या दोन्ही देशांच्या शेजारी राष्ट्रांवर मोठ्या प्रमाणात पडलेला आहे. रशियाने नुकताच युक्रेनवर मोठा क्षेपणास्त्र हल्ला चढवला. त्यामुळे युक्रेनमधील बराचसा भाग अंधारात बुडाला आहे. या दोन्ही देशातील तणाव सध्या सर्वोच्च पातळीवर पोहचला आहे. या युद्धाची मोठी झळ रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांच्या शेजारील राष्ट्रांनाही बसत आहे.

पोलंड हा असा देश आहे, ज्याची सीमा रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांना लागून आहे. नुकतेच पोलंड-युक्रेन सीमेवर क्षेपणास्त्र हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे तिथे तणाव निर्माण झाला होता. त्यामुळेच विश्वचषक स्पर्धेत दाखल होण्यासाठी पोलंडचा संघ जेव्हा विमानाने कतारला निघाला, तेव्हा शेजारील युद्धग्रस्त देशातील तणाव पाहून या विमानाला सुरक्षा प्रदान करण्यात आली होती. त्यामुळे पोलंडच्या टीमच्या या विमानाला चक्क F 16 या लढाऊ विमानांच्या संरक्षणात कतारमध्ये दाखल व्हावे लागले.

पोलंडच्या हवाई सीमेबाहेर जाईपर्यंत ही F 16 या लढाऊ विमाने पोलंडच्या टीमच्या विमानासोबत होती. पोलंड नॅशनल फुटबॉल टीमच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली गेली आहे, त्याचा एक व्हिडिओदेखील शेअर करण्यात आला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, 'आम्हाला F16 विमानांच्या घेऱ्यात पोलंडच्या दक्षिण सीमेपर्यंत पोहचवले गेले. वैमानिकांना धन्यवाद आणि शुभेच्छा!'

दरम्यान, पोलंड ग्रुप सी मध्ये असून त्यांचा पहिला सामना 22 नोव्हेंबर रोजी मेक्सिको विरूद्ध होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT