Javagal Srinath
Javagal Srinath Dainik Gomantak
क्रीडा

Cricketers: तुम्हाला माहितीये का? निवृत्तीनंतर हे 5 खेळाडू पुन्हा मैदानात परतले होते

दैनिक गोमन्तक

Cricketers Who Return Cricket Ground After Retirement: क्रिकेट हा सज्जनांचा खेळ आहे. क्रिकेटच्या इतिहासात असे अनेकदा घडले आहे, जेव्हा क्रिकेटपटू निवृत्तीनंतर पुन्हा मैदानात परतले. आज आमच्या रिपोर्टमध्ये आम्ही त्या 5 घातक खेळाडूंबद्दल सांगणार आहोत, जे निवृत्ती घेतल्यानंतर पुन्हा मैदानात खेळताना दिसले होते. यामध्ये 2 पाकिस्तानी खेळाडू आणि एका स्टार भारतीय गोलंदाजाचा समावेश आहे.

दरम्यान, पाकिस्तानचा पूर्व फलंदाज जावेद मियांदादही निवृत्तीनंतर पुन्हा मैदानात परतला होता. तो 6 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानकडून (Pakistan) खेळला आहे. 1996 च्या विश्वचषकानंतर त्याने निवृत्ती घेतली. परंतु निवृत्तीच्या 10 दिवसांनंतर तो पुन्हा मैदानात परतला होता. मियांदादने 124 कसोटी सामन्यात 8832 धावा केल्या आहेत. तर 231 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याच्या नावावर 7381 धावा आहेत.

दुसरीकडे, पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) षटकार मारण्यासाठी जगभर प्रसिद्ध होता. आफ्रिदीने प्रथम 2010 मध्ये निवृत्तीची घोषणा केली, त्यानंतर 2011 च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील पराभवानंतर त्याने निवृत्तीची घोषणा केली, परंतु त्यानंतर तो मैदानात परतला होता. आफ्रिदीने पाकिस्तानसाठी 398 सामन्यात 8094 धावा केल्या असून 395 विकेट घेतल्या आहेत. अखेरीस, या आफ्रिदीने 2016 मध्ये क्रिकेटला पूर्णपणे अलविदा केला.

तसेच, झिम्बाब्वेचा (Zimbabwe) धोकादायक फलंदाज ब्रेंडन टेलरने 2015 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, कारण काउंटी क्रिकेटमध्ये तसा करार होता. मात्र करार पूर्ण झाल्यानंतर तो झिम्बाब्वे संघात पुन्हा परतला.

शिवाय, भारताचा सुपरस्टार गोलंदाज जवागल श्रीनाथने 2002 मध्येच क्रिकेटला अलविदा केला होता. परंतु सौरव गांगुलीच्या सांगण्यावरुन तो पुन्हा मैदानात परतला होता. 2003 च्या विश्वचषकात त्याने भारतीय संघासाठी मोलाची जबाबदारी पार पाडली होती. विश्वचषकातील अनेक सामने त्याने टीम इंडियाला (Team India) स्वबळावर जिंकून दिले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Sam Pitroda: सॅम पित्रादो 'एक्स'वर ट्रेंडिंग, वादग्रस्त वक्तव्यानंतर मीम्सचा पाऊस

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

SCROLL FOR NEXT