Ukraine Football League : युक्रेनवर रशियाचा हल्ला असूनही, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर फुटबॉल लीग ऑगस्टमध्ये पुन्हा सुरू करण्याची योजना सुरू आहे. युक्रेन फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष आंद्रे पावेलको यांनी एपीला झेलेन्स्की तसेच फुटबॉलची जागतिक संस्था FIFA आणि युरोपियन फुटबॉलची प्रशासकीय संस्था UEFA मधील अधिकारी यांच्याशी झालेल्या संभाषणांमधून हा खुलासा करण्यात आला आहे. संभाषणादरम्यान, युक्रेनमध्ये पुरुषांच्या आणि महिलांच्या स्पर्धा सुरक्षितपणे आयोजित करण्यावर चर्चा झाली.
फेब्रुवारीमध्ये रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याने युक्रेनला आपली लीग थांबवावी लागली होती. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या म्हणण्यानुसार, युक्रेनमधील हजारो लोकांना या हल्ल्यात आपले प्राण गमवावे लागले आणि अनेक गावे आणि शहरे यामध्ये उधवस्थ झाली.
रशियाने पूर्व आणि दक्षिणेकडे सैन्य पुन्हा तैनात केले आहे; परंतु राजधानी कीव आणि इतर ठिकाणी हल्ले कमी झाले आहेत. खेळ पुन्हा सुरू झाल्याने लोकांचे मनोबल वाढेल, अशी आशा आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.