Team India BCCI
क्रीडा

World Cup 2023: भारत-न्यूझीलंड सेमी-फायनलपूर्वी खेळपट्टी बदलली? मैदानाबाहेर पेटला वाद

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs New Zealand Semi-Final, Pitch Controversy:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात उपांत्य फेरीचा पहिला सामना खेळला जाणार आहे. हा सामना बुधवारी (15 नोव्हेंबर) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. दरम्यान, या सामन्यात वानखेडे स्टेडियमवरील खेळपट्टी चर्चेत आहे. ही खेळपट्टी कोणाला मदत करणार अशी चर्चा सध्या होत असतानाच एक नवा वाद समोर आला आहे.

मीडियातील रिपोर्ट्सनुसार वानखेडे स्टेडियमवरील ज्या खेळपट्टीचा उपांत्य सामन्यात वापर होणार होता, त्याच्याऐवजी आता खेळपट्टी बदलण्यात आली आहे, ज्याचा भारतीय गोलंदाजांना फायदा होऊ शकतो.

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार आयसीसीचे पिच कन्सल्टंट अँडी ऍटकिन्सन यांनी भारत-न्यूझीलंड सामन्यासाठी जी खेळपट्टी निवडली होती, तिचा वापर आत्तापर्यंत वर्ल्डकप २०२३ स्पर्धेसाठी झाला नव्हता. पण आता ती खेळपट्टी निवडण्यात आली आहे, ज्यावर दोन सामने खेळवण्यात आले आहेत.

या रिपोर्ट्सनुसार आयसीसीच्या पिच कन्सल्टंटला हे सांगण्यात आले आहे की उपांत्य सामन्यासाठी जी खेळपट्टी निवडण्यात आली होती, त्यावर काहीतरी समस्या आहे.

असे म्हटले जात आहे की या सामन्यासाठी आता वापरण्यात येणारी खेळपट्टी धीमी असणार आहे. त्यावरील गवत काढण्यात आले आहे. त्यामुळे आता नक्की सामन्यात खेळपट्टी कशी असेल याबद्दलची उत्सुकता चाहत्यांमध्ये ताणली गेली आहे.

वानखेडेवर झालेल्या वर्ल्डकपमधील सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर आत्तापर्यंत 4 सामने या मैदानावर झाले आहेत. त्यातील 3 सामन्यांत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी विजय मिळवला आहे, तर एका सामन्यात दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे.

भारताने श्रीलंकेविरुद्ध या मैदानावर सामना खेळला आहे, ज्यात भारताने 357 धावा उभारल्या होत्या, तर श्रीलंकेचा संघ 55 धावांत सर्वबाद झाला होता.

दरम्यान, वनडे वर्ल्डकपमध्ये सलग दुसऱ्यांदा भारत आणि न्यूझीलंड उपांत्य फेरीत आमने-सामने येणार आहेत. यापूर्वी 2019 वर्ल्डकपमध्ये या दोन संघांमध्ये उपांत्य सामना झाला होता, ज्यात न्यूझीलंडने विजय मिळवला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT