IND vs NZ: न्यूझीलंड पुन्हा बनणार टीम इंडियासाठी व्हिलन? पाहा 'हेड टू हेड' रेकॉर्ड्स

World Cup 2023: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्ड्स जाणून घ्या.
India vs New Zealand
India vs New ZealandDainik Gomantak

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs New Zealand, Head to Head Records:

वर्ल्डकप 2023 स्पर्धेत बुधवारी (15 नोव्हेंबर) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात उपांत्य सामना होणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर या सामन्याचा थरार रंगणार आहे. दरम्यान, आत्तापर्यंत या दोन्ही संघात रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत.

विशेष गोष्ट अशी की याआधीच्या म्हणजेच 2019 वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीतही भारत आणि न्यूझीलंड संघांत सामना झाला होता. हा सामना न्यूझीलंडने 18 धावांनी जिंकला होता.

दरम्यान गेल्या काही वर्षात न्यूझीलंड भारतासाठी सर्वात कठीण प्रतिस्पर्धी ठरताना दिसत आहे. तसेच 2000 सालापासून भारताला आयसीसी स्पर्धांच्या बाद फेरीत न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवता आलेला नाही.

India vs New Zealand
IND vs NZ: हायव्होल्टेज भारत-न्यूझीलंड मॅचसाठी दिग्गज फुटबॉलर बेकहॅमची वानखेडेवर हजेरी?

2019 वर्ल्डकपपूर्वी 2000 साली झालेल्या चॅम्पॅयन्स ट्रॉफी (आयसीसी नॉकआऊट स्पर्धा) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारताला 4 विकेट्सने पराभूत केले होते.

तसेच 2019-2021 कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना देखील भारत आणि न्यूझीलंड संघात झाला होता. या सामन्यात न्यूझीलंडने 8 विकेट्सने विजय मिळवला होता.

दरम्यान, हा इतिहास पाहाता भारतीय संघासाठी चिंतेची गोष्ट आहे. त्याचमुळे आता भारतीय संघ हा इतिहास बदलण्याचा प्रयत्न करतील. पण न्यूझीलंडही याच इतिहासाची पुनरागवृत्ती करण्याचा प्रयत्न करतील.

India vs New Zealand
World Cup 2023: 'पुढचा वर्ल्डकप खेळणार नाही, पण निवृत्तीही घेत नाहीये', दिग्गज क्रिकेटरचं मोठं वक्तव्य

वनडेतील आमने-सामने आकडेवारी

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आत्तापर्यंत 117 वनडे सामने खेळवण्यात आले आहेत. यातील 59 सामन्यांत भारताने विजय मिळवला आहे, तर न्यूझीलंड 50 सामन्यांत विजय मिळवला आहे. तसेच 7 सामन्यांचा निकाल लागलेला नाही, तर एक सामना बरोबरीत सुटला आहे.

वनडे वर्ल्डकपमध्ये भारत आणि न्यूझीलंड संघात आत्तापर्यंत 9 सामने झाले आहेत. यातील 5 सामने न्यूझीलंडने जिंकले आहेत, तर 4 सामने भारताने जिंकले आहेत.

तसेच वानखेडे स्टेडियममध्ये या दोन संघात आत्तापर्यंत एकच सामना झाला आहे, ज्यात न्यूझीलंडने 6 विकेट्सने विजय मिळवला होता.

वानखेडे स्टेडियमवरील इतिहास पाहाता भारताने 21 वनडे सामने खेळले असून 12 सामने जिंकले आहेत. तसेच 9 सामन्यात पराभव स्विकारला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com