Pankaj Advani Kishor Petkar
क्रीडा

नामवंत बिलियर्डस-स्नूकरपटू मिरामारला खेळणार

पेट्रोलियम आंतरविभाग स्पर्धा 25 पासून रंगणार; पंकज अडवाणीचे आकर्षण

दैनिक गोमन्तक

पणजी : मिरामार येथील क्लब टेनिस द गास्पार डायस संकुलात या महिनाअखेरीस देशातील नामवंत बिलियर्डस-स्नूकरपटू खेळताना दिसतील. स्पर्धेत ३२ आंतरराष्ट्रीय पदके जिंकलेला दिग्गज खेळाडू पंकज अडवाणी याचे आकर्षण असेल. (Petroleum Inter-Divisional Competition from 25 in Goa)

ऑईल अँड नॅचरल गॅस लिमिटेड (ONGC) यांच्यातर्फे येत्या २५ ते २९ मार्च या कालावधीत १७ वी पेट्रोलियम संघांची बिलियर्डस-स्नूकर स्पर्धा गोव्यात (Goa) घेण्यात येईल. पंकज याच्याव्यतिरिक्त आलोक कुमार, रूपेश शाह, सौरव कोठारी, ध्रुव सितवाला या जागतिक पातळीवरील मातब्बर खेळाडूंचाही स्पर्धेत सहभाग असेल. ते यजमान ओएनजीसी संघातर्फे खेळतील.

स्पर्धेत पेट्रोलियम क्षेत्रातील पाच संस्थांचे संघ सहभागी होतील. इंडियन ऑईल (IOCL) संघात माजी जगज्जेता आदित्य मेहता, लक्ष्मण रावत, ब्रिजेश दमाणी, ध्वज हरिया यांचा असेल. भारत पेट्रोलियम (BPCL) संघात माजी जगज्जेता देवेंद्र जोशी, मनन चंद्रा, शाहबाज आदिल खान, एस. श्रीकृष्ण, क्रिश गुरबक्षानी या प्रमुख खेळाडूंचा समावेश आहे. तर ऑईल इंडिया लिमिटेड व नुमालीगढ रिफायनरी लिमिटेड (एनआरएल) हे स्पर्धेतील अन्य संघ आहेत. बिगरव्यावसायिक खेळाडूंच्या गटात गतविजेत्या आरिफ अख्तर खेळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

10 लाखांचं 800 लिटर अवैध डिझेल जप्त, 5 जणांच्या आवळल्या मुसक्या; मांडवी किनारी गोवा पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

Goa Fraud Case: प्रोजेक्टमध्ये 'गुंतवणुकीचे' आमिष दाखवून गोव्यातील एकाला 1.32 कोटींचा गंडा; केरळमधील दोघांविरोधात गुन्हा दाखल

LIC Scheme: दिवाळीपूर्वी 'एलआयसी'ची मोठी भेट, 15 ऑक्टोबरपासून सुरु करणार 2 खास योजना; जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

रस्त्यावर चूल मांडणं पर्यटकांना भोवलं, ना पोट भरलं, ना खिशाला परवडलं!! वाचा नेमकं काय घडलं?

मडगाव रवींद्र भवनचे नूतनीकरण अंतिम टप्प्यात; 30 ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण! Video

SCROLL FOR NEXT