Ravindra Jadeja Dainik Gomantak
क्रीडा

Ravindra Jadeja: 'सर जडेजा' ला टक्कर देतोय हा धाकड, टीम इंडियात पुनरागमन करणे...!

India vs Sri Lanka: टीम इंडियाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. दुखापती आणि फिटनेसमुळे तो अद्याप पुनरागमन करु शकलेला नाही.

दैनिक गोमन्तक

Wasim Jaffer On Ravindra Jadeja, Axar Patel: टीम इंडियाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. दुखापती आणि फिटनेसमुळे तो अद्याप संघात पुनरागमन करु शकलेला नाही. यातच, त्याच्या दुखापतीमुळे मूळ गुजरातचा असलेल्या अक्षर पटेलला संघात सतत संधी मिळत आहे.

आता टीम इंडियाच्या माजी दिग्गज फलंदाजाने याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. अक्षरच्या ताबडतोब कामगिरीमुळे आता जडेजाबद्दल फारसे कोणी बोलत नाहीये. अशा स्थितीत अक्षर पटेलच्या कामगिरीमुळे जडेजाला टीम इंडियात पुनरागमन करणे कठीण झाल्याचेही मानले जात आहे.

अक्षरने पुण्यात आपली ताकद दाखवून दिली

पुण्यात श्रीलंकेविरुद्धच्या (Sri Lanka) मालिकेतील दुसऱ्या टी-20 सामन्यात अक्षर पटेलने संधीचा पुरेपूर फायदा घेतला. त्याने बॅटने खूप चांगले योगदान दिले. 207 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतला होता. त्यानंतर अक्षर पटेलने सूर्यकुमार यादवसोबत (Suryakumar Yadav) भागीदारी करत अर्धशतकही झळकावले. अक्षरने केवळ 31 चेंडूत 209.68 च्या स्ट्राईक रेटने 65 धावा केल्या. तो बाद होताच टीम इंडियाच्या विजयाच्या आशाही पल्लवित झाल्या होत्या. मात्र शेवटी भारताला हा सामना 16 धावांनी गमवावा लागला.

अक्षरच्या येण्याने संघ बदलला

भारताचा माजी दिग्गज वसीम जाफरने अक्षर पटेलचे कौतुक केले आहे. जाफरने क्रिकइन्फोशी बोलताना सांगितले की, 'टीम इंडियाला जडेजाची नक्कीच उणीव भासते, तो तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळतो, परंतु अक्षर पटेल संघात आल्यानंतर जडेजाबद्दल कोणीही फारसे बोलत नाही, हे ही सत्य आहे. अष्टपैलू म्हणून तो किती मॅच्युअर झाला आहे, हे यावरुन स्पष्ट होते. टीम इंडिया भाग्यवान आहे की, त्यांना पटेलच्या रुपाने आणखी एक अष्टपैलू खेळाडू मिळाला आहे. तो संघासाठी पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी करु शकतो, त्यानंतर विस्फोटक पद्धतीने फलंदाजीही करु शकतो.'

तसेच, 34 वर्षीय जडेजाकडे चांगला अनुभव आहे. त्याने आतापर्यंत 60 कसोटी, 171 एकदिवसीय आणि 64 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटीत 2523 धावा करण्यासोबतच त्याने 242 विकेट्सही घेतल्या आहेत. त्याचबरोबर वनडेमध्ये 2447 धावा आणि 189 विकेट्स, तर टी-20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये 457 धावांसह 51 विकेट्स घेतल्या आहेत. तो शेवटचा आशिया कप-2022 दरम्यान टीम इंडियाच्या जर्सीत दिसला होता. तेव्हापासून तो खराब फिटनेस आणि दुखापतीमुळे संघाबाहेर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Umrah Pilgrims Accident: सौदी अरेबियात भीषण अपघात! मदिनाजवळ टँकरला धडकून बसला आग, 42 भारतीय यात्रेकरूंचा दुर्दैवी मृत्यू

Bihar Election Goa Impact: गोव्याच्या दृष्टीनेही 'बिहार' निकालाचा विचार करणे गरजेचे..

Mhadei Land: 'गोवा मुक्तीच्या आधीपासून लोक इथे राहताहेत'; घर, उत्पन्नाची जागा सोडून अभयारण्य निश्चित करा; म्हादईतील भूमिपुत्रांची मागणी

'यापुढे पारंपरिक सहकारी संस्थांना परवानगी देण्यात येणार नाही'! CM सावंतांचे प्रतिपादन; कर्ज बुडव्‍यांचे प्रमाण वाढल्याचा दावा

Goa Crime: भररात्री क्राईम ब्रांचची धडक कारवाई! म्हापसा हॉटेलमधून 2 अल्पवयीन मुलींची सुटका, मानवी तस्करांना अटक

SCROLL FOR NEXT