Virat Kohli
Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

पाक चाहत्याचा भारतीयांशी पंगा; विराटच्या 'त्या' पोस्टरबाजीनं होणार दंगा

दैनिक गोमन्तक

विराट कोहली हा असा खेळाडू आहे, ज्याची जगभरात चर्चा होते. त्याची फलंदाजीला सर्वच देशांतील लोक पसंत करतात. विशेष म्हणजे विराटची जगाच्या कानाकोपऱ्यात धडाकेबाज खेळाडू म्हणून ओळख आहे. सध्या पाकिस्तानात पाकिस्तानी सुपर लीगचे (Pakistani Super League) आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी मुलतान सुलतान्सने संघाने क्वेटा ग्लॅडिएटर्सशी मुकाबला केला. परंतु या सामन्यादरम्यान एका प्रेक्षकाने टीम इंडियासाठी (Team India) एक निराळीच इच्छा व्यक्त केली आहे. विराटचे (Virat Kohli) पोस्टर प्रेक्षकांच्या हातात असणे आश्चर्यकारक नाही, परंतु या पोस्टरवर जे लिहिले ते विचित्र होते. (Pakistani Fans Have Expressed Their Desire To See India In Pakistan)

दरम्यान, विराटचे पोस्टर घेऊन लाहोरच्या (Lahore) गद्दाफी स्टेडियममध्ये आलेल्या चाहत्याने या पोस्टरवर आपली इच्छा व्यक्त केली आहे. भारत पाकिस्तानमध्ये (Pakistan) सामील होताना पाहायचा आहे. या चाहत्याने विराटच्या पोस्टरवर लिहिले की, “मैं आपके देश को पाकिस्तान में देखना चाहता हूं विराट.”

अनेक दिवसांपासून द्विपक्षीय मालिका खेळली गेली नाही

या पाकिस्तानी दर्शकाने व्यक्त केलेली इच्छा सत्यात येणे अशक्य आहे. अनेक दिवसांपासून दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय मालिका झालेली नाही. याचे कारण दोन्ही देशांतील राजकीय संबंध. भारताने 2012-13 मध्ये पाकिस्तानसोबत शेवटची द्विपक्षीय मालिका खेळली होती. तेव्हापासून या दोघांमध्ये द्विपक्षीय मालिका खेळली गेली नाही. हे दोन संघ फक्त आयसीसी स्पर्धा आणि आशिया चषक स्पर्धेत आमनेसामने येतात.

गेल्या वर्षी संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळल्या गेलेल्या ICC T20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने आले होते, ज्यामध्ये भारताचा पराभव झाला होता. विश्वचषकात भारताचा पाकिस्तानकडून पराभव होण्याची ही पहिलीच वेळ होती. या वर्षी ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक होणार आहे. या विश्वचषकात भारत आणि पाकिस्तानचे संघ पुन्हा आमनेसामने येणार आहेत. हा सामना 23 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

मुलतान सुलतान्सने धावांचा पाऊस पाडला

पीएसएल सामन्याबाबत बोलायचे झाले तर, मुलतानच्या संघाने या सामन्यात धावांचा पाऊस पाडला असून डोंगर उभा केला आहे. प्रथम फलंदाजी करताना मुलतान संघाने तीन गडी गमावून 245 धावा केल्या. मुलतान संघाकडून शान मसूदने 57 धावा, कर्णधार मोहम्मद रिझवान 83, रिले रोस्वोने 71 धावा केल्या. रिलेने 26 चेंडूंत नऊ चौकार आणि चार षटकार ठोकले. त्याचा स्ट्राइक रेट 273.07 होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Imran Khan Comeback: इम्रान खान नऊ वर्षांनंतर करणार कमबॅक, गोव्यात शूटिंग सुरू; आमिरचा कॅमिओ

Sattari Farmer : काजूला २५० रु. आधारभूत किंमत द्या : सत्तरीतील बागायतदार

Goa Today's Live News Update: ताळगाव ग्रामपंचायत निवडणूक, मोन्सेरात पॅनल विजयी

Gram Panchayat Karapur : कारापूर-सर्वण ग्रामपंचायत पर्यायी जागेच्या शोधात

नागरिकांची हत्या, मीडियावर बंदी… 'या' मुस्लिमबहुल देशात लष्कर अराजकता का निर्माण करतयं?

SCROLL FOR NEXT