Fakhar Zaman Dainik Gomantak
क्रीडा

PAK vs NZ: भारत आणि ऑस्ट्रेलियानंतर, पाकिस्तान ठरला 500 वनडे सामने जिंकणारा तिसरा देश, फखर जमानने ठोकलं 'शतक'

Manish Jadhav

Pakistan vs New Zealand, 1st Odi: पाकिस्तानविरुद्धची टी-20 मालिका अनिर्णित ठेवल्यानंतर एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली.

रावळपिंडीत खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात संघाचा पाच गडी राखून पराभव झाला. या विजयामुळे पाकिस्तानने पाच एकदिवसीय मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. याशिवाय, या विजयामुळेच पाकिस्तानने मोठी कामगिरी केली आहे.

फखर जमानची शानदार कामगिरी

या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना न्यूझीलंडने सात गडी गमावून 288 धावा केल्या. संघाने बोवेसची विकेट लवकर गमावली परंतु नंतर विल यंग आणि डॅरिल मिशेल यांनी मोठी पाटर्नशीप केली.

यंगने 86 आणि मिचेलने 113 धावा केल्या. मात्र, पाकिस्तानने (Pakistan) हे लक्ष्य नऊ चेंडू राखून पूर्ण केले. संघाकडून फखर जमानने 117 धावा केल्या, तर इमाम-उल-हकने 60 धावा केल्या. याशिवाय, बाबर आझमनेही 49 धावा केल्या. फखरच्या शतकाने मिशेलचे शतक झाकाळून गेले.

पाकिस्तानने 500 वी वनडे जिंकली

ऑस्ट्रेलिया आणि भारतानंतर (India) 500 वनडे जिंकणारा पाकिस्तान हा तिसरा देश ठरला आहे. पाकिस्तानने एकूण 949 एकदिवसीय सामने खेळले आहेत, त्यापैकी 500 पाकिस्तानने जिंकले आहेत.

त्याने 420 सामने गमावले आहेत, नऊ सामने बरोबरीत राहिले आणि 20 सामने अनिर्णित राहिले. सर्वाधिक एकदिवसीय सामने जिंकण्याच्या बाबतीत ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर आहे.

ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक एकदिवसीय सामने जिंकले आहेत

ऑस्ट्रेलियाने 1971 पासून आतापर्यंत 978 एकदिवसीय सामने खेळले आहेत, त्यापैकी 594 सामने त्यांनी जिंकले आहेत.

यातील नऊ सामने बरोबरीत राहिले, तर 34 सामने अनिर्णित राहिले. भारतीय संघ 1974 मध्ये पहिला एकदिवसीय सामना खेळला होता.

1029 सामन्यांपैकी 539 सामने जिंकले आहेत. सर्वाधिक एकदिवसीय सामने जिंकण्याच्या बाबतीत भारत पाकिस्तानच्या पुढे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim News: भाडेकरूंची डिचोली पोलिस स्थानकात गर्दी! कार्यक्षेत्रात तपासणी मोहिमेला वेग

'गोवा पोलिस' अंमलीपदार्थांविरोधी गंभीर! 'कोकेन जप्ती'प्रकरणी दिल्ली पोलिसांना करणार सहकार्य

Quelossim: ही तर नौटंकी! केळशीची बदनामी केल्याचा व्हेंझी यांच्‍यावर सरपंचांचा आरोप

Sunburn Festival 2024: धार्मिक स्थळी 'असले' कार्यक्रम नकोच! 'सनबर्न' साठीच्या सभेनंतर ग्रामस्थ ठरवणार दिशा

Israel-Iran War: इस्रायल-इराण युद्धानं सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार! भारतासह जगभरातील देशांना बसणार फटका

SCROLL FOR NEXT